शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळतोय उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 2:24 PM

निर्यात बंदीनंतरही दर टिकून; नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांनाही मागे टाकले

ठळक मुद्देनिर्यात बंदीनंतर राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वरचेवर वाढत आहे सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत कांद्याला उच्चांकी (सर्वाधिक) दर मिळत आहेकांद्याचे सर्वाधिक उत्पादन व विक्री करणाºया नाशिक जिल्ह्यालाही सोलापूर बाजार समितीने दराबाबत मागे टाकले

अरुण बारसकर 

सोलापूर :  निर्यात बंदीनंतर राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वरचेवर वाढत आहे.  असे असले तरी दर मात्र स्थिर असल्याचे दिसत आहे. सध्या सोलापूरबाजार समितीमध्ये राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत कांद्याला उच्चांकी (सर्वाधिक) दर मिळत आहे.  कांद्याचे सर्वाधिक उत्पादन व विक्री करणाºया नाशिक जिल्ह्यालाही सोलापूर बाजार समितीने दराबाबत मागे टाकले आहे.

राज्यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणा, चांदवड, कळवण या प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी अथवा साठवणुकीच्या कांद्याची विक्री  मोठ्या प्रमाणावर होते. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर बाजार समिती कांदा विक्रीत आघाडीवर असतात. राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही कांद्याची आवक व विक्री होते; मात्र त्याचे प्रमाण कमी असते तसेच सतत वर्षभर कांद्याचे लिलाव होत नाहीत. सप्टेंबर महिन्यात कांद्याची आवक कमी होऊ लागल्यानंतर दर वाढीला सुरुवात झाली. 

क्विंटलला ८०० ते १००० रुपये असलेला दर पाच हजारांच्या दरम्यान विक्री होऊ लागला. आवक कमी व कांद्याचे दर वरचेवर वाढू लागल्यानंतर केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी घातली. याचा परिणाम दराची घसरण होईल असे वाटत होते मात्र दर स्थिर राहिल्याचे आकडेवारीवरुन दिसून  येते. 

या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक ३९०० रुपये दर मिळाला आहे. तर सोलापूर बाजार समितीमध्ये क्विंटलला ४३५० रुपयांचा दर मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीतही नाशिक   जिल्ह्यातील बाजार समित्यापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. 

यावर्षीचा उच्चांकी दरही सोलापुरातच..- सप्टेंबर महिन्यातील तिसºया आठवड्यात राज्यभरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. या आठवड्यात सोलापूर बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक  ५ हजार ३२५ रुपये, लासलगावला ५ हजार १०० रुपये, उमराणा व  पिंपळगाव बसवंत बाजार समितीत प्रत्येकी ४ हजार ८०० रुपये, कळवण बाजार समितीत ४ हजार ७६५ रुपये तर  चांदवड बाजार समितीत क्विंटलला ४ हजार ९०० रुपये दर मिळाला होता. यावर्षीचे हे उच्चांकी दर आहेत. च्आॅक्टोबरमध्ये लासलगाव बाजार समितीत प्रतिक्विंटलला ३४५२ ते ३,८२५ रुपये, उमराणा बाजार समितीत ३२४० पासून ३८०० रुपये, पिंपळगाव बाजार समितीत ३४५५ ते ३८११ रुपये, कळवण बाजार समितीत ३३०० ते ३९०० रुपये  तर सोलापूर बाजार समितीत ४१५० ते ४३५० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. हे सर्वाधिक दर आहेत. 

सोलापूर बाजार समितीत शनिवारी (१२ आॅक्टोबर) १५ हजार १४३ क्विंटल कांद्याची आवक व विक्री झाली. सर्वाधिक ४,२७५ रुपयाने कांदा विकला. शुक्रवारी (११आॅक्टोबर) ९ हजार १५९ क्विंटलची विक्री झाली. सर्वाधिक  ४,३५० रुपये दर मिळाला. राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक दर मिळत आहे. - श्रीशैल नरोळेउपसभापती, सोलापूर बाजार समिती 

उशिरा पाऊस झाल्याने कांद्याची लागवड मागील १५ दिवसापासून सुरू आहे. यामुळे आमच्या भागातील कांदा विक्रीसाठी येण्यास अवधी लागणार आहे. सध्या कांद्याला भाव असला तरी आमचा कांदा बाजारात येईपर्यंत दर टीकेलच असे नाही. दोन-तीन हजाराने कांदा विक्री झाला तरी शेतकºयांना परवडते.- भारत जगदाळे, कांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारNashikनाशिक