एक योग ‘चार’ चा

By Admin | Updated: October 31, 2014 00:52 IST2014-10-31T00:52:58+5:302014-10-31T00:52:58+5:30

राजकारण आणि ज्योतिष्याचा योग नेहमी जुळून येतो! नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही ४ या आकड्याचा अनोखा योग घडून आला आहे. अंकतज्ञांनी फडणवीसांसाठी ४ आकडा लाभदायी असल्याचे सांगितले आहे.

One Yoga is 'Four' | एक योग ‘चार’ चा

एक योग ‘चार’ चा

अनपेक्षित यश देणारा आकडा : अंकतज्ज्ञांचे मत
मंगेश व्यवहारे - नागपूर
राजकारण आणि ज्योतिष्याचा योग नेहमी जुळून येतो! नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही ४ या आकड्याचा अनोखा योग घडून आला आहे. अंकतज्ञांनी फडणवीसांसाठी ४ आकडा लाभदायी असल्याचे सांगितले आहे.
अंकशास्त्राच्या नियमानुसार ४ हा अंक मंगळ आणि राहूचे प्रतिनिधित्व करतो. मंगळ हा ग्रह प्रचंड ऊर्जा आणि धाडसाचे प्रतीक आहे. बहुतांश राजकारण्यांच्या कुंडलित मंगळाचे प्रभुत्व दिसून येते. शिवाय राहू हा ग्रह वारसांचा आशीर्वाद देऊन जातो. अनिश्चितेतून काहीतरी ठोस मिळवून देणारा ४ आकडा आहे. हा आकडा प्रभावी असणाऱ्या व्यक्तीला जीवनात खूप लवकर ब्रेक मिळतो. ही व्यक्ती प्रचंड मेहनती असते. त्यांची दूरदृष्टी सामान्य व्यक्तीपेक्षा काहीतरी वेगळी असते. ते आयुष्यात खूप प्रॅक्टीकल असतात. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही हे गुण दिसून येतात. सध्या त्यांच्यावर ४ आकड्याचे प्रभुत्व दिसून येत आहे. विशेष म्हणजे फडणवीसांचा जन्मदिनाचा आकडा २२ आहे. २२ ची बेरीज ४ येते. त्यांचा शपथविधी सोहळा ३१ ला आहे. याही आकड्याची बेरीज ४ येते. ते चौथ्यांदा आमदार बनले, सध्या ते ४४ वर्षाचे आहेत. योगायोगाने भाजपाला बहुमतसुद्धा १३ पर्यंत सिद्ध करायचे आहे. ही बेरीजही ४ येते. विशेष म्हणजे ते विदर्भातील चौथे मुख्यमंत्री होणार आहेत. हा चौकारांचा षटकार योगायोगाने का होईना त्यांच्या बाबतीत जुळून आलेला आहे. कदाचित मुख्यमंत्री बनण्यासाठी शुभांक ठरला आहे.
कल्पनाशक्तीपेक्षा जास्त मिळवून देतो
४ या आकड्याचे यश हे अनिश्चित असते. जसे अचानक लॉटरी लागणे म्हणता येईल. देवेंद्र फडणवीसांवर ४ चे प्रभुत्व असल्याने पक्षात ज्येष्ठ नेते असतानाही त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे. अशांना लवकर ब्रेक मिळतो. फडणवीस यांनाही महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री ही पदे अतिशय कमी वयात मिळाली आहे. निळा रंग हा त्यांच्यासाठी लकी असतो. त्यामुळे कदाचित शपथविधी सोहळ्यातही त्यांचा पेहरावा निळ्या रंगाचा राहू शकतो.
पं. महेंद्रकुमार महाजन, अंकज्योतिष

Web Title: One Yoga is 'Four'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.