ठाणे स्टेशनवर एकाला ट्रेनमधून फेकले

By Admin | Updated: October 28, 2016 00:02 IST2016-10-28T00:02:12+5:302016-10-28T00:02:12+5:30

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर आलेल्या अंबरनाथ लोकलखाली सापडून 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला

One was thrown out of the train at Thane station | ठाणे स्टेशनवर एकाला ट्रेनमधून फेकले

ठाणे स्टेशनवर एकाला ट्रेनमधून फेकले

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 27 - ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर आलेल्या अंबरनाथ लोकलखाली सापडून 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रात्री 9.36 वाजताच्या सुमारास घडली. ठाणे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांमध्ये झालेल्या वादातून एकाला फलाट क्र. २च्या रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.

त्या व्यक्तीच्या अपघातात मृत्यू झाला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या सर्व प्रकारामुळे लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिरानं धावत होत्या. मृतदेहाची अद्याप ओळख अस्पष्ट आहे.

Web Title: One was thrown out of the train at Thane station