डोक्यात दगड घालून खडकीत एकाचा खून

By Admin | Updated: November 2, 2016 01:29 IST2016-11-02T01:29:42+5:302016-11-02T01:29:42+5:30

एकाच ठिकाणी काम करताना झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. परस्पर मंदिरात लग्न लावून एकत्रित राहू लागले.

One stone in stone with a stone in the stone | डोक्यात दगड घालून खडकीत एकाचा खून

डोक्यात दगड घालून खडकीत एकाचा खून


खडकी : एकाच ठिकाणी काम करताना झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. परस्पर मंदिरात लग्न लावून एकत्रित राहू लागले. हे खटकल्याने फिर्यादी मुलीच्या मामाने तिच्या पतीचा डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून केला. खडकीतील ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता विलास राठोड (वय ३०, सर्व्हंट क्वार्टर, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, खडकी) या महिलेने फिर्याद दिली आहे. या महिलेने तिच्याबरोबर मजुरी काम करणाऱ्या आनंद सखाराम वाघमारे (वय ३४, सिद्धार्थनगर, वाघोली) या मजुराशी लग्न केले.
एक महिन्यापूर्वी मंदिरात लग्न लावल्यानंतर ते दोघेही एकत्र राहत होते. फिर्यादीचा मामा हरिदास राठोड (वय ४५, रा. सर्व्हंट क्वार्टर, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, खडकी) या आरोपीला भाचीने वाघमारे या मजुराबरोबर परस्पर लग्न केल्याचा राग आला. रागाच्या भरात त्याने वाघमारे यांना गाठून त्यांच्या डोक्यात दगड घातले. गंभीर जखमी झालेल्या वाघमारे यांचा मृत्यू झाला. आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: One stone in stone with a stone in the stone