शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

वन रुपी क्लिनिकचे ‘शटरडाउन’, रेल्वे स्थानकांवरील सेवा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 4:10 AM

सर्वसामान्यांना केवळ एक रुपयात सेवा देणारे ‘वन रुपी क्लिनिक’चे शटरडाउन होणार आहे. रेल्वे प्रशासनाचा अंतर्गत वाद आणि राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम क्लिनिकच्या सेवेवर होत असल्याने

स्नेहा मोरे मुंबई : सर्वसामान्यांना केवळ एक रुपयात सेवा देणारे ‘वन रुपी क्लिनिक’चे शटरडाउन होणार आहे. रेल्वे प्रशासनाचा अंतर्गत वाद आणि राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम क्लिनिकच्या सेवेवर होत असल्याने सर्व रेल्वे स्थानकांवरील ‘वन रुपी क्लिनिक’ची सेवा येत्या दोन दिवसांत बंद करण्यात येणार आहे. मात्र या क्लिनिकची सेवा शहर-उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये लवकरच सुरू होणार आहे.रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत वादामुळे यापूर्वी दादर येथील ‘वन रुपी क्लिनिक’ तोडण्यात आले होते. त्यानंतर काही काळानंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र बºयाच ठिकाणी वारंवार रेल्वेच्या अंतर्गत वाद आणि राजकीय हस्तक्षेपाचा अनुभव आल्याने रेल्वे मार्गांवरील ‘वन रुपी क्लिनिक’ची सेवा थेट बंद करण्याचा निर्णय क्लिनिकचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी घेतला आहे.मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना तक्रारीचे पत्र लिहून हा निर्णय त्यांनी रेल्वे प्रशासनाला कळविला आहे. या पत्रात रेल्वे अधिकाºयांच्या वादामुळे दादर येथील क्लिनिकच्या फार्मसीमध्ये जून महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, अंबरनाथ येथील क्लिनिकच्या जागेबाबत राजकीय हस्तक्षेप केल्याने वाद उद्भवला आहे. नव्याने ११ स्थानकांवर सुरू होणाºया क्लिनिकसाठी ११ लाखांचा निधी जमा करण्यात आला होता. परंतु, काही बड्या राजकीय नेत्यांमुळे रेल्वे प्रशासन बºयाचदा या क्लिनिकच्या जागा बदलत असल्याचे निदर्शनास आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सामान्यांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचा लवकरच विस्तार होणार असून झोपडपट्ट्यांप्रमाणेच घरपोच आरोग्यसेवा सुरू होणार आहे. यात क्लिनिक्सच्या माध्यमातून घराघरांत जाऊन सामान्यांना ही सेवा पुरविण्यात येणार आहे.सेवेवरील परिणाम टाळण्यासाठी निर्णयरेल्वे प्रशासनाच्या वाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ‘वन रुपी क्लिनिक’च्या सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे सेवेत खंड पडू नये किंवा क्लिनिकचे नुकसान होऊ नये या विचारातून रेल्वे मार्गांवरील क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या सर्व क्लिनिक्समध्ये २० हजार रुग्णांची नोंद करण्यात आली, तर अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीत २०० रुग्णांवर उपचार करण्यात आले, असे वन रुपी क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.