शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पक्षावर एकानेच वर्चस्व गाजवू नये; युक्तिवादात अजित पवार गटाचा आरोप, सुनावणी महिनाभर लांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 07:14 IST

...पण निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ९ नोव्हेंबरची तारीख दिली.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाविषयी भारतीय निवडणूक आयोगापुढे सुरू असलेली सुनावणी आता तब्बल एक महिन्यानंतर, ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा करताना अजित पवार गटाने ही सुनावणी तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी केली. पण निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ९ नोव्हेंबरची तारीख दिली.

आज आयोगापुढे अजित पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल, मनिंदर सिंह आणि सिद्धार्थ भटनागर यांनी युक्तिवाद केला, तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. आजच्या सुनावणीला शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि वंदना चव्हाण उपस्थित होते, तर अजित पवार गटाचे प्रतिनिधित्व त्यांच्या वकिलांनी केले.

शरद पवार गटाला वेळ मिळू नये, म्हणून या प्रकरणाची सुनावणी वेगाने संपविण्याचा अजित पवार गटाकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रयत्नांचा निषेध करीत आयोगाने याप्रकरणी युक्तिवादाची सुरुवात ९ नोव्हेंबरपासून होईल, असे स्पष्ट केले. संपूर्ण दस्तावेज चाळण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळावा, ही मागणी आयोगाने मान्य केल्याचे शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.

आमदार किती सांगा?दोन्ही गटांकडून आक्रमकपणे युक्तिवाद करण्यात आला. पक्षावर कोणतीही एक व्यक्ती वर्चस्व गाजवू शकत नाही. पण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात लोकशाही नाही, असा आरोप अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल यांनी केला, तर अजित पवारांकडे असलेल्या आमदारांची नावे आयोगापुढे का सादर केली नाही, असा सवाल शरद पवार गटाने केला.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग