शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत रिकाम्या बाटलीस मिळणार एक रुपया! मंदिर परिसरात रिसायकलिंग यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 03:04 IST

साईबाबा मंदिर परिसरात वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पुनर्प्रक्रियेसाठी जमा करण्यात येणार आहेत़ त्यासाठी गुरुवारी साईबाबा मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ या मशिनमध्ये बाटली टाकल्यास भाविकाला एक रुपयाचे कुपन मिळणार आहे़

शिर्डी : साईबाबा मंदिर परिसरात वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पुनर्प्रक्रियेसाठी जमा करण्यात येणार आहेत़ त्यासाठी गुरुवारी साईबाबा मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ या मशिनमध्ये बाटली टाकल्यास भाविकाला एक रुपयाचे कुपन मिळणार आहे़स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पेप्सीको इंडिया व जेम इन्व्हायरो मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ खासदार दिलीप गांधी व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांच्या हस्ते या मशिनचा गुरुवारी लोकार्पण सोहळा झाला़या पेट रिसायकलिंग मशिनमध्ये रिकामी कोणतीही प्लॅस्टिकची बॉटल टाकल्यास ती क्रॅश होऊन एक रुपयाचे कुपन मिळणार आहे. तसेच मशिनमध्ये हाताने प्रेस करून बाटली क्रॅश करण्याची सुविधा आहे़ यातूनही एक रुपयाचे कुपन मिळेल किंवा अ‍ॅप डाउनलोड करून घेतला तर मोबाईल व्हॅलेटमध्ये एक रुपया जमा होणार आहे. बाटल्यांचे रिसायकलिंग करून गारमेंट व बॅगा बनवण्यात येतात, असे सचिन शर्मा यांनी सांगतले़राज्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानवाशिम : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अखत्यारितील अधिकारी, कर्मचाºयांना स्वच्छतेची जबाबदारी दिली जाणार आहे.

टॅग्स :shirdiशिर्डी