शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षेला समित्यांचा डोस : नागरी भागासाठी स्वतंत्र समिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 20:56 IST

रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती तसेच सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी राज्यभरात जिल्हा रस्ता सुरक्षा समित्या अस्तित्वात आहेत. त्यात आता आणखी एका समितीची भर पडणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा रस्ता सुरक्षा समिती असताना आणखी एक समिती राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांचाही या समितीत समावेश समित्यांमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतुक पोलीस उपनिरीक्षक, स्थापत्य अभियंता यांचा समावेशदर तीन महिन्यांनी समितीची बैठक

पुणे : रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती तसेच सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी राज्यभरात जिल्हा रस्ता सुरक्षा समित्या अस्तित्वात आहेत. त्यात आता आणखी एका समितीची भर पडणार आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिसरातील अपघातप्रवण क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी महापालिका व नगरपरिषदा किंवा नगरपंचायतींसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने शुक्रवारी दिले.मागील अनेक वर्षांपासून सर्व जिल्ह्यांमध्ये रस्ते सुरक्षा समिती आहेत. या समित्यांचे अध्यक्ष पुर्वी जिल्हाधिकारी होते. पण केंद्र सरकारने त्यात बदल करून यावर्षी जानेवारी महिन्यापासून जुन्या समित्या बरखास्त करून जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. या समित्यांमध्ये जिल्हयातील सर्व आमदारांनाही सदस्य स्थान देण्यात आले. तसेच  जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापौर, उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, शिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचा मुख्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांचाही या समितीत समावेश आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत. दर तीन महिन्यांनी समितीची बैठक होते. जिल्हातील रस्त्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेणे, अपघातांची कारणे शोधणे, अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती घेणे, त्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे, रस्ता सुरक्षेच्या सर्व मानकांची पूर्तता करणे अशा विविध जबाबदाºया या समितीवर सोपविण्यात आल्या आहेत. जिल्हा समिती असतानाही आता नागरी भागासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी लागणार आहे. रस्ते सुरक्षेबाबत शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी दिल्ली इंटिग्रेटेड मल्टीमोडल ट्रांसपोर्ट सिस्टीम या संस्थेने केलेल्या शिफारसशींच्या अनुषंगाने या समित्या नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रासाठी पालिका आयुक्त तर नगरपालिका व नगरपरिषदांसाठी जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष असतील. दोन्ही समित्यांमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वाहतुक पोलीस उपनिरीक्षक, अभियांत्रिकी कॉलेजचे प्रतिनिधी, स्थापत्य अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे.................नागरी भागातील रस्ते सुरक्षेचा लेखा अहवाल तयार करणे, वर्षातून दोनदा सुरक्षेची पाहणी करणे, आवश्यक उपाययोजना करणे, त्याचा दर तीन महिन्यांनी आढावा घेणे, अपघात प्रणव क्षेत्रांची पाहणी करणे ही कामे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही समित्यांवर सोपविण्यात आली आहेत. हीच जबाबदारी जिल्हा समितीकडेही आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षेसाठी आणखी एका समितीची भर पडली आहे.

टॅग्स :Puneपुणेstate transportराज्य परीवहन महामंडळGovernmentसरकारroad safetyरस्ते सुरक्षा