शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रामाकडे अलिप्ततेने पहायला शिकणे आवश्यक : बाबासाहेब पुरंदरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 22:15 IST

राम मंदिर व्हावे असे ज्यांना वाटायचे त्यामध्ये अहिंदू सुद्धा मोठ्या संख्येने

ठळक मुद्देक्रिकेट खूप आवडता खेळ असून मी डावखुरा बॉलर

पुणे : अयोध्येमध्ये राम मंदिर उभे राहतेय याचा आनंद आहे. काहींना धाडस होत नसले तरी त्यांना आनंद होतोच आहे. मी कारसेवेमध्ये सहभागी झालेलो होतो. त्या दिवशीची रात्र आम्ही अयोध्येमध्ये पदपथावर झोपून काढली होती. बंदीवासात असलेला राम पुन्हा समर्थपणे उभा राहतोय. राम मंदिर व्हावे असे ज्यांना वाटायचे त्यामध्ये अहिंदू सुद्धा मोठ्या संख्येने होते. त्यामुळे रामाकडे अलिप्ततेने पाहता येणे आवश्यक असल्याचे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखेच्यावतीने आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये पुरंदरे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी, परिषदेचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जोग, शिवाजीनगरचे अध्यक्ष जगदीश घोंगडे, विश्वास नायडू, डॉ. हर्डीकर, अभिजीत फडके उपस्थित होते. यावेळी पुरंदरे म्हणाले, मी आतापर्यंत चार कांदबºया लिहिल्या, इतिहासावर पुस्तके लिहिली, हजारो व्याख्याने दिली, नाटकही केले. परंतू, मला कोणीही कादंबरीकार, इतिहासकार, व्याख्याता, नाटककार म्हणत नाही. मी सगळ्यांत आहे; परंतू कशातच नाही. आमचे मूळ आडनाव लोकरस असून कर्नाटकातून पुर्वज मोरगावला आले. तेथे एका घटनेमुळे वाघ आडनाव पडले. पुढे चालून पुरंदरे वाघ असे पडलेले आडनाव बदलत जाऊन फक्त पुरंदरे राहिल्याचे त्यांनी सांगितले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी आयुष्यातील पहिले व्याख्यान कधी व केव्हा दिले, भारत इतिहास संशोधक मंडळातील अभ्यास आणि निवडणुकीचे किस्से, आवडते व्याख्याते म्हणून स्वा. सावरकरांविषयीच्या भावना यावेळी विषद केल्या. यासोबतच पु. ल. देशपांडे, दामू केंकरे, आचार्य अत्रे, शांताबाई हुबळीकर, बालगंधर्व, नानासाहेब फाटक, ललिता पवार, गो. नी. दांडेकर, चि. वी. जोशी, दिनानाथ दलाल, दिनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर, दादरा-नगर-हवेली आणि गोवा मुक्ती संग्रामाविषयीच्या आठवणी जागविल्या. आपण टीव्ही फारसे पाहात नाही. परंतू, क्रिकेट पहायला खूप आवडते. लहानपणी मी डावखुरा बॉलर होतो. छान खेळता यायचे असे ते म्हणाले. शिवचरित्र प्रकाशित करण्यासाठीचा खर्च हडपसरमध्ये खरेदी केलेल्या कोथिंबीरीच्या जुडया मुंबईत विकून जुळविला. जाणता राजा या नाटकाला आधी  ह्यशेवटीचा दिवस गोड व्हावा असे नाव दिले होते. परंतू, त्याच नावाचे दुसरे नाटक आल्याने वकिलाच्या सल्ल्याने समर्थ रामदासांच्या ओवीतील जाणता राजा हे नाव दिले. या नाटकामध्ये डॉ. श्रीराम लागू, चंद्रकांत मांढरे, ज्योत्सा भोळे, दुगार्बाई खोटे, वसंत शिंदे आदी कलाकारांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवचरित्र साक्षात उभे करणे आवश्यक आहे. मग ते कोणत्याही माध्यमाने करा. ऐतिहासिक कलाकृती निर्माण करताना सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठीच शिवसृष्टीचे काम हाती घेतले आहे. त्यातील एक भाग बांधून पूर्ण झाल्याचे पुरंदरे म्हणाले. ====राजा हा विष्णूचा अवतार असतो अशी मान्यता आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी सुद्धा राज्यकर्तेच आहेत. त्यामुळे त्यांनी एकमेकांचा अपमान करु नये किंवा नागरिकांनीही त्यांचा अपमान करु नये. वृत्तवाहिन्यांनी सुद्धा लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते यांच्यासह समाजातील प्रतिष्ठितांचा अपमान करु नये. सर्वांनी एकमेकांचा सन्मान राखायला हवा असे पुरंदरे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेAyodhyaअयोध्या