मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार नाल्यात पडून 1 ठार, 3 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 13:44 IST2017-08-02T11:53:37+5:302017-08-02T13:44:32+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगातील इनोव्हा कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने नाल्यात कोसळली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार नाल्यात पडून 1 ठार, 3 जखमी
लोणावळा, दि. 2 - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगातील इनोव्हा कार क्र. (MH 23 AK 3888) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरुन तब्बल ३ झाडांना धडकून नाल्यामध्ये कोसळली. या अपघातात 1 जण जागीच ठार तर ३ जण जखमी झाले आहेत. आज पहाटे 2:30 वाजता पाटण गावाजवळ हा अपघात झाला.
अपघातात सांदीपान भगवान शिंदे वय ६० वर्षे रा.बीड) यांचा मृत्यू झाला असून, सुभाष साहेबराव जगताप (वय ७० वर्षे), किसन जठार (वय ७१ वर्ष), मुक्ताराम किसन तावरे (वय ७१वर्षे सर्व राहणार धानेगल्ली, बीड) हे जखमी झाले आहेत. जखमीना निगडी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.