दुचाकी अपघातात १ ठार, १ जखमी

By Admin | Updated: May 14, 2014 05:49 IST2014-05-14T05:49:48+5:302014-05-14T05:49:48+5:30

उरुळी कांचन येथे झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातांत लोणी काळभोरचे माजी ग्रामपंचायत सदस्य मृत्युमुखी पडले असून, यामध्ये एक जण गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला आहे.

One killed, 1 injured in two-wheeler accident | दुचाकी अपघातात १ ठार, १ जखमी

दुचाकी अपघातात १ ठार, १ जखमी

लोणी काळभोर : उरुळी कांचन येथे झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातांत लोणी काळभोरचे माजी ग्रामपंचायत सदस्य मृत्युमुखी पडले असून, यामध्ये एक जण गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. १२) सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन गावाच्या हद्दीत चौधरी माथ्याजवळ प्रयागधाम फाटा येथे झाला. यामध्ये लोणी काळभोरचे माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश बबन सायकर (४८, रा. लोणी काळभोर) हे मृत्युमुखी पडलेले असून, त्यांचे मित्र तात्यासाो एकनाथ काळभोर (४५, रा. पांढरीमळा) हे गंभीर जखमी आहेत. या दोघांना धडक दिलेले यश बाळासाहेब कुलकर्णी (वय २४, रा. यवत) हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच त्यांना तातडीने हडपसर येथील खासगी रुग्णालयात तातडीने उपचारांसाठी पाठवण्यात आले. आज सकाळी सायकर यांचे उपचार चालू असताना निधन झाले. (प्रतिनिधी)

Web Title: One killed, 1 injured in two-wheeler accident