शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

जळगावात एक तर नंदुरबारच्या तीन कारखान्यांची साखर ‘गोड’, गळीत हंगामाची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 06:40 IST

गेल्या वर्षी एक मेव मुक्ताई शुगर एनर्जी साखर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केला होता. आणि यंदा ही गळीत च्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. तर दुसरी कडे जिल्हयातील उर्वरित साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदाही सुरू होणार नसल्याचीच स्थिती आहे.

जळगाव/धुळे/नंदुरबार : साखर कारखाने सुरू असणे हे त्या जिल्ह्यातील सहकार क्षेत्र बळकट असल्याचे मानले जाते. धुळे जिल्हा वगळता नंदुरबार जिल्ह्यात तीन व जळगाव जिल्ह्यातील केवळ एक कारखाना गळीत हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहे.साधारण १५ आॅक्टोबर नंतर राज्यातील साखर साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होतात. जळगाव जिल्ह्यातही याच काळात मुहूर्त साधला जातो. गेल्या वर्षी एक मेव मुक्ताई शुगर एनर्जी साखर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केला होता. आणि यंदा ही गळीत च्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. तर दुसरी कडे जिल्हयातील उर्वरित साखर कारखान्याचा  गळीत हंगाम यंदाही सुरू होणार नसल्याचीच स्थिती आहे.जिल्ह्यातील साखर कारखानदारीत अग्रगण्य असलेल्या फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या वर्षीपासून बंद आहे. दुसरी कडे चोपडा साखर कारखाना ही आर्थिक कोंडीतून बाहेर पडू न शकल्याने बंद आहे. चाळीसगावचा बेलगंगा, रावेरचा कारखाना खाजगी कंपनीकडे जाऊनही चालू शकला नाही. तर एरंडोल तालुक्यातील वसंत कारखाना अनेक वर्षांपासून बंदच आहे.जिल्ह्यात खाजगीकरणातून सुरू असलेला मुक्ताई शुगर एनर्जी साखर कारखान्याने मागील ६ गळीत हंगाम यशस्वी पूर्ण केले असून वीज निर्मिती सह प्रकल्प ही यशस्वी झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात एकमेव मुक्ताईनगर चा हा कारखाना सुरू होता. कारखान्याने १०.६७ चा उतारा साध्य केला होता.२५ मेट्रिक टन प्रति दिवस क्षमता असलेल्या या कारखान्यात २०२० - २१ च्या गळीत हंगामात ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यातून १०.५ टक्के उतारा गाठून पाच लाख २५ हजार क्विंटल साखर उत्पादन होईल तर १२ मेगावॉट वीज निर्मिती होईल असा विश्वास कारखान्याचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड रोहिणी खडसे व कार्यकारी संचालक देवरे यांनी व्यक्त केला.तिन्ही साखर कारखाने यंदा गाळप हंगाम घेणारनंदुरबार जिल्ह्यात यंदा ३० हजार एकरपेक्षा अधीक क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने यंदा सुरू होणार आहे. आॅक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होणार असल्याची माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात सहकारी तत्वावरील दोन तर खाजगी तत्वावरील एक कारखाना आहे. हे तिन्ही कारखाने दरवर्षी गाळप हंगाम घेतात. यंदाही त्यांनी गाळपाचे नियोजन केले आहे. यंदा जिल्ह्यात ३० हजार एकरपेक्षा अधीक क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे सहकारी तत्वावरील शहादा येथील सातपुडा साखर कारखाना, डोकारे, ता.नवापूर येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना आणि खाजगी तत्वावरील समशेरपूर, ता.नंदुरबार येथील आयान शुगर साखर कारखाने यंदा गाळप हंगाम घेणार आहेत. या तिन्ही साखर कारखान्यांनी मशिनरी दुसरूस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते काम पुर्ण होणार आहे. त्यानंतर आॅक्टोबरच्या तिसºया आठवड्यात गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. साधारणत: पाच ते सहा महिने कारखाने सुरू राहतील असा अंदाज आहे.धुळे जिल्ह्यातील चारही साखर कारखाने बंदावस्थेतधुळे जिल्ह्यात पूर्वी चार साखर कारखाने होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हे चारही कारखाने अनेक वर्षांपासून बंदावस्थेत आहे. जिल्ह्यातील नवलनगर येथील संजय सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले येथे असलेला शिंदखेडा शेतकरी सहकारी साखर कारखाना काही दिवसच सुरू होता. साक्री तालुक्यातील भदाणे येथील पांझरा-कान सहकारी साखर कारखाना हा देखील कर्जबाजारीपणामुळे २००० सालापासून बंद आहे. या कारखान्याची गाळप क्षमता १२०० मेट्रीक टन एवढी होती. तर शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखानाही जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जामुळे २०११-१२ पासून बंद आहे. या कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रीक टन एवढी होती. दरम्यान जिल्ह्यात एकही साखर कारखाना नसल्याने, शेतकऱ्यांनीही ऊस लागवडीकडे पाठ फिरवली आहे. यावर्षी ४ हजार ५३० हेक्टर लागडीचे उद्दिष्ट असतांना फक्त १ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरच ऊसाची लागवड झालेली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेJalgaonजळगावDhuleधुळे