दुष्काळग्रस्तांना एमसीएची एक कोटी रुपयांची मदत
By Admin | Updated: September 10, 2015 19:46 IST2015-09-10T19:46:06+5:302015-09-10T19:46:06+5:30
दुष्काळाच्या भीषण संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला मुंबई क्रिकेटने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळग्रस्तांना एमसीएची एक कोटी रुपयांची मदत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - दुष्काळाच्या भीषण संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला मुंबई क्रिकेटने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑक्टोबर रोजी होणा-या भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यातून मिळणा-या निधीतून ही मदत दिली जाणार असल्याचे समजते.
राज्यात विशेषतः मराठवाडा येथे भीषण दुष्काळ पडण्याची चिन्हे असून वरुण राजाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या मराठी कलाकारांनी शेतक-यांना मदतीचा हात दिला असतानाच आता मुंबई क्रिकेट असोसिएशननेही दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल असे एमसीएने जाहीर केले आहे. एमसीएच्या या निर्णयानंतर क्रिकेट व जाहिरातींमधून कोट्यावधी कमावणारे क्रिकेटपटू दुष्काळग्रस्ताना मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.