शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 09:57 IST

बारामतीत २ मुलींसोबत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकारामुळे अजित पवारांनी तात्काळ पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

बारामती - शहरातील २ अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  आज सकाळी बारामतीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत महिला सुरक्षेसाठी शहरात शक्ती अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधन हे अभियानातून करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली. 

अजित पवार म्हणाले की, बारामती शहराला काळीमा फासणारी जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. अलीकडच्या काळात जन्माला आलेली मुले इतके स्मार्ट आहेत, मुलं प्रश्न विचारतात. अल्पवयीन मुलांच्या वयाची मर्यादा १४ पासून करता येईल का याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. हा कायदा करताना केंद्राला सांगावं लागेल. मी दिल्लीला गेल्यानंतर नक्की याविषयी बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांचीही चर्चा करणार आहे. अलीकडच्या काळात अल्पवयीन मुले गुन्ह्यात अडकत आहे. त्याविषयी निर्णय करण्याचा विचार आम्ही करू असं अजित पवारांनी सांगितले. यावेळी अजित पवारांनी बारामती शहरात सुरक्षेच्या दृष्टीने पंचशक्ती अभियानाची घोषणा केली. नेमकं कसं असेल हे अभियान जाणून घेऊया. 

शक्ती बॉक्स तक्रार पेटी 

मुलींचा पाठलाग करणे, त्यांना मेसेज पाठवणे, कधीकधी दुसऱ्यांच्या फोनवरून संपर्क साधणे, मनमोकळेपणाने मुलींना या गोष्टी सांगता येत नाही. ज्या मुली तक्रार करण्यासाठी घाबरतात त्यांच्यासाठी शहरातील सर्व परिसरात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, एसटी स्टँड, पोस्ट ऑफिस, महिला वसतीगृह इथं शक्ती बॉक्स तक्रार पेटी लावण्यात येईल. या तक्रार पेटीत गोपनीय तक्रारीही देता येईल, २-३ दिवसांत हा बॉक्स उघडून त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. संबंधितांचे नाव गोपनीय ठेवण्याची दक्षता घेतली जाईल. शहरातील कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. 

शक्ती हेल्पलाईन - एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह - 9209394917 

बारामती शहरातील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा ठेवण्यासाठी ही कॉल सेवा २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. शाळा, कॉलेज, सरकारी, खासगी संस्था, कंपनी, हॉस्पिटल येथे दर्शनी भागात हे नंबर लावले जातील. अवैध धंदे, महिला छेडछाड याबाबत तक्रार आणि लोकेशन शेअर करून पोलिसांकडून कारवाई केली जाईल. 

शक्ती कक्ष 

बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष उभारण्यात येईल. त्यात २ महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येईल. महिला, मुली आणि बालके यांना भयमुक्त वातावरण तयार करणे, अन्याय सहन न करता निर्भयपणे पुढे येणे, महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करणे अशी कामे केली जातील. 

शक्ती नजर 

सोशल मीडियात व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुले किंवा इतर व्यक्ती धारदार शस्त्रे, बंदूक, चाकू घेऊन फोटो, व्हिडिओ स्टेटस ठेवतात. त्यावर शक्ती नजर असणार आहे. असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. 

शक्ती भेट 

शहरातील शाळा, कॉलेज, सरकारी आणि खासगी कार्यालये, हॉस्पिटल, एसटी स्टँड, महिला वसतीगृह याठिकाणी भेटी देऊन तिथल्या मुलींना महिला विषयक कायदे, गुड टच बॅड टच, व्यसनाधीन मुले, लैंगिक छळ आणि मानसिक तक्रारीची दखल घेत त्यांच्यात जागरुकता आणणे,  प्रबोधनात्मक कायदे विषयक महिलांसाठी व्याख्याने, युवाशक्तीला व्यसने आणि गुन्हेगारी यातून प्रवृत्त करणे, संवेदनशील ठिकाणी वारंवार पेट्रोलिंग करून महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचारास आळा घातला जाईल अशाप्रकारे अभियानाची पंचशक्ती राबवली जाणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली.  

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसBaramatiबारामती