शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

भिडेंसह एकबोटेंना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही- दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 9:02 PM

कोेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नसून गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. त्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. मी कुठेही क्लीन चिटबाबत बोललो नाही, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले, ते सावंतवाडी येथे बोलत होते.

सावंतवाडी : कोेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नसून गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. त्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. मी कुठेही क्लीन चिटबाबत बोललो नाही, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले, ते सावंतवाडी येथे बोलत होते. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार  नाही. या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे सुरू असून, पोलीस दोषींवर कारवाई करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.मंत्री केसरकर हे विविध कार्यक्रमांसाठी शुक्रवारी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली.मंत्री केसरकर म्हणाले, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असणा-या अनैतिक धंद्यांची जबाबदारी कोणावर सोपवायची याचा गृह विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती अभ्यास करीत आहेत. त्याचा अहवाल लवकरच ही समिती सरकारला देईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमध्ये पोलिसांच्या गाडीतच अवैध दारू सापडलेल्या घटनेबाबत त्यांनी माहिती दिली. अवैध बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नेमकी जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर टाकायची का, याबाबत गृहविभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती एका महिन्यात अहवाल देणार आहे. त्यानंतर अवैध धंद्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. अनैतिक धंदे नियंत्रणात येतील, असा विश्वास गृहराज्यमंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील ठेकेदार निविदा भरत नाहीत तसेच खड्ड्यांच्या निविदा भरण्याचे टाळणा-यांचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे अभिमानाने समर्थन करत आहेत. ठेकेदारांनी आपण मोठे झाल्याचे विसरून निविदा भरण्याचे टाळले असल्याने कामे होत नाहीत. अशा ठेकेदारांविरोधात समाजानेच उभे राहायला हवे. जनतेला वेठीस धरणा-यांच्या विरोधात जनता आवाज उठवत नसल्याने त्यांचे फावते, असे मत पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.कोरेगाव-भीमा दंगलीतील संबंधितांवर कारवाई होत आहे. यात आमच्या सरकारचा कोणता ह हस्तक्षेप असणार नाही, पोलीस आपले काम करीत आहेत. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देण्याबाबत शासन प्रामाणिक प्रयत्न करेल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. कोेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही. गुन्हा नोंदविण्यात आल्यावर चौकशी सुरू असल्याचे मी म्हटले होते, असे गृहराज्यमंत्री केसरकर म्हणाले. भिडे गुरुजींचे वय ८४ असून गडकोट दुरुस्तीसाठी ते झटताहेत, त्यामुळे त्यांचे कार्यही महत्त्वाचे आहे. पण मराठा समाजाने माझे अभिनंदन केले नाही सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाच्या मोर्चास आमच्या खासदार, आमदारांसह मी सहकार्य केले होते. मी गृहराज्यमंत्री असल्याने नैतिकता पाळली. त्यामुळे या मोर्चात सामील झालो नव्हतो. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली. तेव्हा माझे अभिनंदन मात्र मराठा समाजाने केले नाही, अशी खंत गृहराज्यमंत्री केसरकर यांनी यावेळी बोलून दाखवली. माझ्या मतदारसंघातील शिवसेनेचे बहुतेक सर्व पदाधिकारी मराठाच आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Bhima-koregaonभीमा-कोरेगावSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी