पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक
By Admin | Updated: May 17, 2014 21:48 IST2014-05-17T19:52:01+5:302014-05-17T21:48:48+5:30
पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉडने एकाला मारहाण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली.

पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक
पुणे : पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉडने एकाला मारहाण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली. आरोपीला सोमवारपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला.
धनराज भिमा वायदंडे (वय ३३, गोसवी वस्ती, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी इम्राण गौस शेख (वय ३६, रा. वैदुवस्ती, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. दिनेश उर्फ घोडेदिना व आरोपीचा मेहुण्याचा पोलिस तपास करीत आहेत. फिर्यादी व आरोपी हे एकाच वस्तीत राहण्यास आहेत. १ महिन्यांपूर्वी यातील फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये पैशाच्या देवाण घेवाणीवरून भांडणे झाली होती. त्यावेळी हडपसर पोलिसांनी दोघांवर कारवाई केली होती. या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपीने व पाहिजे असलेल्या आरोपींशी संगनमत करून २६ मार्चला श्ेाख यांना तू पोलिसांत तक्रार करतोस काय? असे दटावत लोखंडी रॉड व हॉकीस्टिकने माराहण करून गंभीर जखमी केले.
आारेपींच्या पूर्वीच्या भांडणाची मूळ कारणे काय आहेत. गुन्ातील हत्यारे जप्त करायची आहेत यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकिल अनिल कुंभार यांनी केला. न्यायालयाने युक्तिवाद ग्रा धरला.