शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, मेघना श्रीवास्तव देशात अव्वल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 16:48 IST

‘सीबीएसई’मार्फत दि. ५ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत परिक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देया परीक्षेसाठी देशभरातून ११ लाख ८४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी एकुण ९ लाख १८ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.०१ टक्के परीक्षेचा निकालमंडळाच्या दहा विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.३२ टक्के

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून गाझियाबाद येथील मेघना श्रीवास्तव हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला. पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींचाच दबदबा राहिला आहे. परीक्षेच्या एकुण निकालाची टक्केवारी ८३.०१ एवढी आहे.‘सीबीएसई’मार्फत दि. ५ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत परिक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून ११ लाख ८४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ लाख ६ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकुण ९ लाख १८ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.०१ टक्के परीक्षेचा निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एक टक्क्यांनी अधिक आहे. एकुण विद्यार्थ्यांपैकी ८८.३१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७८.९९ एवढी आहे. मुलींच्या तुलनेत मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९.३२ टक्क्यांनी कमी आहे. एकुण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ७३७ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक तर ७२ हजार ५९९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.गाझियाबाद मधील स्टेप बाय स्टेप शाळेतील मेघना श्रीवास्तव हिने ९९.८ टक्के गुण मिळाले आहेत. इंग्रजी वगळता तिला सर्व विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर इंग्रजीमध्ये तिला ९९ गुण मिळाले. गाझियाबाद येथीलच अनुष्का चंद्रा हिला मेघनापेक्षा केवळ १ गुण कमी मिळाला असून ती ९९.६ टक्के गुणांसह देशात दुसरी आली आहे. तिसºया क्रमांकावर सात जण असून त्यांना प्रत्येकी ४९७ म्हणजे ९९.४ टक्के गुण मिळाले आहेत. चाहत बोधराज, आस्था बाम्बा, तनुजा काप्री, सुप्रिया कौशिक, नकुल गुप्ता, क्षितीज आनंद व अनन्या सिंग अशी त्यांची नावे आहेत. मंडळाच्या दहा विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.३२ टक्के लागला आहे. त्याखालोखाल चेन्नईचा ९३.८७ आणि दिल्ली विभागात ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेCBSE 12th Result 2018सीबीएसई बारावी परीक्षा निकाल २०१८Womenमहिलाeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी