शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘हॉर्न ओके प्लीज’वर अखेर फुली!

By admin | Updated: May 2, 2015 02:07 IST

वाहनांच्या पाठिमागे ‘हॉर्न ओके प्लीज’ असा संदेश लिहिण्यास मनाई करत परिवहन विभागाने सार्वजनिक व संवेदनशील ठिकाणी विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरुध्द ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘एचबीकेबी’

मुंबई : वाहनांच्या पाठिमागे ‘हॉर्न ओके प्लीज’ असा संदेश लिहिण्यास मनाई करत परिवहन विभागाने सार्वजनिक व संवेदनशील ठिकाणी विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरुध्द ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘एचबीकेबी’ (हॉर्न बजाने की बिमारी) मोहिमेवर शिक्कामोर्तब केले.रुग्णालय, धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालयांचा परिसर आणि नागरी वस्त्या अशा ठिकाणी अथवा रस्त्यांवरसुद्धा विनाकारण कर्णकर्कश्श हॉर्न वाजविण्याचा प्रघात वाढत आहे. त्यातून ध्वनिप्रदूषणाबरोबरच अनेकांना कर्णबधिरतेची बाधा होत आहे. निष्कारण हॉर्न वाजविण्याच्या प्रकाराविरुध्द लोकमत वृत्तपत्र समूहाने ‘एचबीकेबी’ नावाने विशेष जनजागृती मोहिम राबविली होती. या मोहिमेची दखल घेत प्राण्यांचे आवाज, भेसूर आणि कर्कश्श हॉर्नच्या विरोधात परिवहन विभागाने व्यापक मोहिम उघडली होती. आता त्यापुढे आणखी एक पाऊल परिवहन विभागाने उचलले असून वाहनांच्या पाठिमागे ‘हॉर्न ओके प्लीस’ असा संदेश लिहिण्यास मनाई केली आहे.‘हॉर्न ओके प्लीज’ असा संदेश लिहिलेली वाहने पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना हॉर्न वाजविण्यासाठी विनाकारण उद्युक्त करतात. शिवाय, शांतता क्षेत्राचा नियमही पायदळी तुडविला जातो, असे परिवहन विभागाने म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)