शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ऑफलाइन परीक्षा, हिंदुस्थानी भाऊ आणि ती मुलगी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 11:45 IST

हिंदुस्थानी भाऊ नावाच्या व्यक्तीने परीक्षा ऑनलाइन घ्या म्हणून वादळ उठवून दिले. शिक्षणतज्ज्ञ संतप्त झाले. बाबूरावांना हे समजले. त्यांनी तत्काळ काही शिक्षणतज्ज्ञांना फोन केले. अन्...

अतुल कुलकर्णी -

कोरोनानंतर सगळ्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, हिंदुस्थानी भाऊ नावाच्या व्यक्तीने परीक्षा ऑनलाइन घ्या म्हणून वादळ उठवून दिले. शिक्षणतज्ज्ञ संतप्त झाले. बाबूरावांना हे समजले. त्यांनी तत्काळ काही शिक्षणतज्ज्ञांना फोन केले. तेव्हा चिडलेल्या तज्ज्ञांनी त्यांना कॉलेजमध्ये मुलांसोबत बोलण्याचे निमंत्रण दिले. बाबूराव कॉलेजच्या दिशेने निघाले. एका कॉलेजच्या दारातच त्यांना चकचकीत गाड्यांमधून, हातात स्लीक मोबाईल घेऊन किणकिणत येणाऱ्या पोरा-पोरींचे दर्शन झाले. ते पाहून देश प्रगती करतोय, यावर त्यांचा विश्वास बसला. परीक्षा ऑफलाइन होणार, म्हणून काही चॅनलचे रिपोर्टरही तेथे पोहोचले. त्यांच्यातील संवाद ऐकायला बाबूराव तेथेच उभे राहिले. चॅनलवाली विचारत होती आणि मुलं उत्तरं देत होती...- तुमचे शिक्षण घरुनच सुरू होते. आता तू कॉलेजला आली आहेस... परीक्षादेखील ऑफलाइन होणार आहेत... काय प्रतिक्रिया आहे तुझी? - हिंदुस्थानी भाऊ आमच्यासाठी भांडत होता ते बरे होते. ऑनलाइन शिकत असताना व्हिडीओ ऑफ करुन ओटीटीवर सिनेमे बघता यायचे. आतादेखील ऑनलाइन परीक्षा असती तर कोणीही प्रश्नपत्रिका सोडवली असती. पण आता ते नाही करता येणार... - काय बघायचीस ओटीटीवर तू....? सिनेमे की अभ्यासाचे व्हिडीओज...?- अरे, ओटीटीवर कुठे असतात अभ्यासाचे व्हिडीओज. तेथे फक्त मज्जा बघायची...- अरे पण आई-वडील काही म्हणायचे नाहीत का...?- त्यांना आमच्या रुममध्ये ‘नो एंट्री’ असते ना... तुम्ही असे काकू टाईप प्रश्न नका विचारु. ते विचारायचे असतील तर आम्ही नाही बोलणार...- बरं ते जाऊ दे... अधून मधून कधी देशभक्तीचे सिनेमे पाहिले की नाही...?- पाहिले ना... उरी पाहिला मी.... काय क्यूट दिसत होता ना विकी कौशल... उगाच नाही कटरिनाने त्याला गटवला...- अरे, पण तू देशभक्तीचे सिनेमे पाहात होतीस की भलतेच काही बघत होतीस... ते जाऊ दे. तू कॉलेजमध्ये कोणता विषय शिकतेस...- मी हिस्ट्री विषय घेतला आहे. सोप्पा असतो ना तो...- मग तुला इतिहासातील महापुरुषांबद्दल काही सांगता येईल का..?- म्हणजे कोणाबद्दल विचारायचं आहे तुम्हाला...? तुम्ही काही नावं सांगा बरं...- अरे महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मंगल पांडे यांच्याबद्दल काय सांगशील?- हे पहा, मला परेश रावल आवडतो... एकदम भारी दिसतो ना तो... सो क्यूट ना... पण परेश रावलचा काय संबंध इथे... - (प्रश्नार्थक चेहऱ्याने) तुम्हाला माहिती नाही, ‘सरदार’ नावाच्या चित्रपटात परेश रावलनी काम केलंय. त्यात त्याची भूमिका चांगलीच होती आणि महात्मा गांधी बघावा तर रिचर्ड ॲटनबरोचाच... तसा गांधी होणे नाही... मंगल पांडे तर अमीर खाननेच करावा... क्यूटेस्ट होता तो...- चॅनलवाल्या मुलीने थरथरत पुन्हा विचारले, आपल्या मराठीतल्या तानाजी मालुसरेंचे योगदान तरी माहिती आहे का तुला... तू इतिहास शिकतेस ना...- माहिती कसे नाही... अजय देवगणने केला होता ना तानाजी.... पण अमीर खान भारी होता बरं का...ती सगळी चर्चा ऐकून बाबूरावांना चक्कर येणे बाकी होते. उगाच नाही शिक्षणतज्ज्ञ संतापले यावर त्यांचा विश्वास बसला. त्यांनी हिंमत करुन त्या मुलीला विचारले, ‘बाई गं, तुझं अगाध ज्ञान मी ऐकतोय मघापासून... तू इतिहास विषय सोडून दे... त्यापेक्षा सिनेमाचा नीट अभ्यास कर... त्यात तरी तुझं करियर होईल. तो हिंदुस्थानी भाऊ तुला आयुष्यभर पुरणार नाही. तू केलेला अभ्यासच तुझ्या कामी येणार आहे.’ त्यावर बाबूरावांकडे रागीट नजरेने पाहात ती मुलगी ताडताड करत निघून गेली... तर चॅनलवाल्या मुलीने लगेच बाबूरावांच्या तोंडापुढे माईक नेऊन प्रश्न केलाच...- तुम्हाला हिंदुस्थानी भाऊचा स्टॅन्ड आवडला की शिक्षणमंत्र्यांनी केलेली घोषणा आवडली...तुमचाच,बाबूराव 

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीMediaमाध्यमेTeacherशिक्षक