शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘टीडीआर’मध्ये गुंतले अधिकारी

By admin | Updated: July 23, 2015 00:32 IST

भूपाल शेटे : नावे जाहीर; फौजदारी संहितेखाली कारवाईची मागणी

कोल्हापूर : प्रत्यक्षात नसलेली ११,९४० चौरस मीटर जागा कागदोपत्री दाखवून कोट्यवधी रुपयांचा टीडीआर लाटून फसवणूक प्रकरणात महापालिका, महसूल, नगररचना व भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांची साखळी असून, या सर्वांवर फौजदारी संहितेनुसार कारवाई करण्याची मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली. याप्रकरणी माहितीसाठी नगरसेवक भूपाल शेटे यांचा राजारामपुरी पोलिसांनी बुधवारी जबाब घेतला. हा जबाब अपूर्ण असून आज, गुरुवारी पूर्ण होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांची नावे शेटे यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.धैर्यशील पांडुरंग यादव या बांधकाम व्यावसायिकाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून आठ हजार चौ.मी. जागा असताना १९,०४० चौ.मी.जागेचा टीडीआर घेतला होता. नगरसेवक भूपाल शेटे यांच्यामुळे अडीच वर्षांपूर्वी बोगस कागदपत्रांच्या आधारे टीडीआर लाटल्याचे हे प्रकरण बाहेर आले. राजकीय दबावामुळे त्यावेळी दबलेले हे प्रकरण आयुक्त पी. शिवशंकर यांनी फौजदारी दाखल करण्याची तयारी दाखविल्याने पुन्हा उजेडात आले.या प्रकरणी शेटे यांचा पोलिसांनी बुधवारी जबाब घेतला. यावेळी तत्कालीन उपायुक्त संजय हेरवाडे, सहायक संचालक नगररचना मारुती राठोड, भूमी उपअधीक्षक सुरेश रेड्डी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, महापालिकेचे वकील प्रशांत चिटणीस, उपशहर अभियंता एम. एम. निर्मळे, सहायक अभियंता एस. बी. देशपांडे, कनिष्ठ अभियंता एस. एन. भाईक, आदींनी कशाप्रकारे महापालिकेची आर्थिक लूट केली याचा लेखी जबाब दिल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले.प्रत्यक्षात आठ हजार चौ.मी. जागा असताना १९,०६० चौ.मी. जागा असल्याबाबत स्थानिक वृत्तपत्रांत जाहीर नोटीस दिली. विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सुरक्षा भिंत बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे ८० लाख रुपयांऐवजी फक्त ७,६८,८०८ रुपये भरून घेत ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर राठोड यांनी करवीर तहसीलदारांना लेखी पत्राद्वारे या जागेवर मनपाचे नाव लावण्याची विनंती केली. शहानिशा न करताच दोन हजार चौरस मीटर जागेचा सात-बारा महापालिकेला दिला.टीडीआरचा मुद्दा विधानसभेतकोल्हापूर : महापालिकेने शहरातील २०३ जमिनींचे गेल्या पंधरा वर्षांत टीडीआर (हस्तांतरण विकसित हक्क) अदा केले आहेत. महापालिक ा अधिकाऱ्यांच्या उदासीन कार्यक्षमतेमुळे त्यातील अनेक प्रकरणांत कोट्यवधी रुपयांचा घोळ झाल्याचा संशय आहे. त्यातील अनेक प्रकरणांची पोलिसांत तक्रार केली आहे. महापालिकेने आतापर्यंत दिलेल्या सर्व टीडीआर प्रकरणांची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी बुधवारी विधानसभेत औचित्यांच्या मुद्द्यांआधारे मागितली. विकास आराखड्यानुसार आरक्षित जागांचा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पडताळणी केलेली नाही. कागदोपत्री जादा जागा दाखवून आर्थिक नुकसान करण्यात महसूल, भूमी अभिलेख कार्यालय, महापालिका व नगररचना विभागातील अधिकारी गुंतले आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी करून कारवाईची मागणी नरके यांनी केली आहे.पुरावे गोळा करण्याचे काम सुरूआरक्षित क्रीडांगणाची दोन एकर जागा दाखवून पाच एकरांचा टीडीआर घेतल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत धैर्यशील पांडुरंग यादव (रा. एमएलजी शाळेजवळ, भवानी मंडप) या संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोघांचे जबाब घेतले आहेत. साक्षीदार नगरसेवक भूपाल शेटे यांचा बुधवारी जबाब घेण्यात आला. तो अपुरा असून आज, गुरुवारी पुन्हा घेण्यात येणार आहे. याप्रकरणी महत्त्वाची कागदपत्रे, जबाब व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी दिली.