एक कोटीचा विक्रीकर बुडविल्याने गुन्हा

By Admin | Updated: May 29, 2014 11:50 IST2014-05-28T21:49:07+5:302014-05-29T11:50:43+5:30

जळगाव : खोटे विवरण पत्र तयार करीत शासनाचा एक कोटी १९ लाख ६४ हजार ८४६ रुपयांचा विक्रीकर बुडविल्याप्रकरणी मे.श्रीनाथ कापार्ेरेशन कंपनीच्या मालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Offense of selling one crore | एक कोटीचा विक्रीकर बुडविल्याने गुन्हा

एक कोटीचा विक्रीकर बुडविल्याने गुन्हा

श्रीनाथ कापार्ेरेशनच्या मालकाचा समावेश

जळगाव : खोटे विवरण पत्र तयार करीत शासनाचा एक कोटी १९ लाख ६४ हजार ८४६ रुपयांचा विक्रीकर बुडविल्याप्रकरणी मे.श्रीनाथ   कार्पोरेशन कंपनीच्या मालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विक्रीकर निरीक्षक बळीराम यशवंत सपकाळे (वय-५७) यांनी फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, इंदूर येथील कमलेश कैलासचंद यादव यांच्या नावाने श्रीनाथ कॉपार्ेरेशन हे कॉटन व सोयाबीनच्या व्यापाराचे दुकान होते. यादव यांनी १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २००९ या कालावधित तीन कोटी ६२ लाख ७६ हजार ३१० रुपयांच्या मालाची विक्री केली. या रकमेवर ४५ लाख ३४ हजार ५३९ इतका विक्रीकर भरणे आवश्यक होते. मात्र यादव यांनी मूळ रक्कम व त्यावरील व्याज व दंड अशी एक कोटी १९ लाख ६४ हजार ८४६ इतकी रक्कम विक्रीकर कार्यालयातील तिजोरीत न भरता स्वत:कडे ठेवून अपहार केला.
विक्रीकर कार्यालयाने यादव यांच्याकडे ही रक्कम भरण्याबाबत पाठपुरावा केला. त्यावेळी यादव यांनी वेळोवेळी खोटे विवरण पत्र व खोटी माहिती देत अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी बळीराम सपकाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कमलेश कैलास यादव याच्याविरुद्ध भादंवि कलम ४०५,४०६,४०९ व महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम २००५ च्या विविध कलमांतर्गत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक पी.व्ही.पवार करीत आहेत.

Web Title: Offense of selling one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.