शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 07:02 IST

तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने नाराज झालेले नेते विरोधी पक्षांची कास धरत आहेत. 

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होताच तिकिटासाठी पक्षबदलाचा ऑक्टोबर हिट सुरू झाला आहे. ज्या पक्षातून आपल्याला तिकीट मिळेल, तिकडे जाण्याचा कल वाढल्याचे यातून दिसून येत आहे. त्यादृष्टीने काही नेत्यांनी इतर पक्षांच्या प्रमुखांची भेट घेण्याचा सपाटाही लावला आहे. तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने नाराज झालेले नेते विरोधी पक्षांची कास धरत आहेत. 

सिंधुदुर्गातील भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे विश्वासू असलेले राजन तेली, भाजपाचेच सिल्लोड मतदारसंघातील प्रदेश चिटणीस सुरेश बनकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सोलापूर येथील माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला आहे. अजित पवार गटातील मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी शरद पवारांची भेट घेतली. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर गेलेले अभिजित पाटील, एकेकाळचे शरद पवारांचे समर्थक आणि नंतर भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेही मुलासाठी शुक्रवारी पवारांना भेटले. तसेच पिंपरी-चिंचवडमधून इच्छुक असलेले विलास लांडे, शिंदेसेनेचे आमदार किशोर दराडे पुतण्याच्या उमेदवारीसाठी पवारांना भेटल्याचे समजते.

अँजिओग्राफीनंतर उद्धव ठाकरे रणधुमाळीत उतरलेअँजिओग्राफीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. पहिल्याच दिवशी तीन महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश करत त्यांनी महायुतीला धक्का दिला आहे. अद्याप मी उमेदवार जाहीर केलेले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेशावेळी स्पष्ट केले असले, तरी या तिघांना उमेदवारी देण्याचे संकेत मात्र त्यांनी दिले आहेत.

राजन तेलीराजन तेली हे नारायण राणे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. मी शिवसेना सोडून मोठी चूक केली होती. मी शिवसेना सोडली नसती तर दीपक केसरकर यांचा राजकीय जन्म झालाच नसता, असे तेली म्हणाले. त्यांना सावंतवाडी मतदारसंघातून शिदेसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात येऊ शकते.

सुरेश बनकरसिल्लोडमधील भाजपा प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांच्या रूपाने मंत्री अब्दुल सत्तार यांना आता आव्हान मिळेल. जुलूमशाही हा सिल्लोड मतदारसंघाला लागलेला कलंक पुसण्याची संधी मिळाली, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दीपक आबा साळुंखे -अजित पवार गटाचे सोलापूरचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी उद्धवसेनेची मशाल हाती घेतली. सांगोल्याचा माझा आधीचा आमदार गद्दार झाला तरी सांगोलेकर सोबत आहेत हे दाखवून द्यायचे आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

शरद पवारांना भेटू, तिकिटाचे बोलू -सतीश चव्हाणहे संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितात. लवकरच शरद पवार गटाकडून त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाने त्यांना पक्षातून निलंबित केले. लक्ष्मण ढोबळे : यांना आपल्यामुलासाठी मोहळ मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी हवी असल्याचे समजते.

पुतणी उभी राहणार काकांविरोधातबुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आमदार राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिगणे यांनीही शरद पवारांची भेट घेतली. मी पक्ष सोडलेला नाही, पक्षाबरोबर मी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे मला उमेदवारी मिळावी, अशी मागणी आपण शरद पवारांकडे केल्याचे गायत्री यांनी सांगितले. अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRajan Teliराजन तेली