पंदेकृवि कुलगुरू पदाच्या नोटीफिकेशनकडे लक्ष!

By Admin | Updated: May 24, 2017 02:07 IST2017-05-24T02:07:41+5:302017-05-24T02:07:41+5:30

समितीचे गठन : आॅगस्टमध्ये संपणार कार्यकाळ

Observe the post of Vice Chancellor Vice Chancellor! | पंदेकृवि कुलगुरू पदाच्या नोटीफिकेशनकडे लक्ष!

पंदेकृवि कुलगुरू पदाच्या नोटीफिकेशनकडे लक्ष!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी याच कृषी विद्यापीठाचे आजी-माजी संचालक, शास्त्रज्ञ स्पर्धेत उतरले आहे; परंतु अद्याप नोटीफिकेशन निघाले नसल्याने याकडे कृषी विद्यापीठ कर्मचारी, अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ येत्या आॅगस्ट महिन्यात संपणार आहे. त्या दृष्टीने तीन महिने अगोदर कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली आहे. समिती राज्यपालांच्या विचारार्थ कुलगुरूपदासाठी योग्य व्यक्तींच्या नावाची यादी सादर करणार आहे.
दरम्यान, या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी सध्या कार्यरत ज्येष्ठ शास्त्रज्ञांसह माजी संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञांचा समावेश आहे. तसेच एक माजी कुलसचिव व माजी संशोधन संचालकाचा समावेश असल्याचे वृत्त आहे; पण यामध्ये इतरही कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांची नावे आहेत.

Web Title: Observe the post of Vice Chancellor Vice Chancellor!