शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

श्याम मानव यांच्याबाबत आक्षेपार्ह प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 22:01 IST

अमरावती : अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांच्याबाबत सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह आणि गंभीर स्वरुपाची प्रतिक्रिया नोंदविणाऱ्या अश्विन कोल्हे पाटीलवर तत्काळ कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन गुरुवारी अमरावती जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. 'श्याम मानव यांच्या हत्येचा कट' या मथळ्याचे लोकमतचे वृत्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक किशोर वाघ ...

अमरावती : अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांच्याबाबत सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह आणि गंभीर स्वरुपाची प्रतिक्रिया नोंदविणाऱ्या अश्विन कोल्हे पाटीलवर तत्काळ कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन गुरुवारी अमरावती जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. 

'श्याम मानव यांच्या हत्येचा कट' या मथळ्याचे लोकमतचे वृत्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक किशोर वाघ यांनी फेसबुकवर अपलोड केले. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.  हा सिलसिला सुरू असताना बुलडाणा येथील अश्विन कोल्हे नावाच्या अकाऊंटवरून 'करायच होत खत्म जो हिंदु विरोधी, त्याला जगण्याचा अधिकारच नाही' अशी टिपणी केली गेली. मानव यांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती एटीएसने यापूर्वीच न्यायालयात सादर केली आहे. त्याअनुषंगाने अमरावतीत येऊन तपासही करण्यात आला आहे.

 घटनेला ही पार्श्वभूमी असताना कोल्हे पाटील नावाने अपलोड करण्यात आलेली प्रतिक्रिया गंभीर कृत्य ठरते, अशा भावना निवेदनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे व्यक्त केल्यात. मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आलेल्या या निवेदनात मानव यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Sanatan Sansthaसनातन संस्थाFacebookफेसबुकPoliceपोलिस