शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 05:48 IST

दुपारी १२ वाजता नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून हा मोर्चा निघेल. संविधान चौकात मोर्चा पोहोचून तेथे जाहीर सभा होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :   राज्य सरकारने २ सप्टेंबरला   काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली. हा जीआर  रद्द करावा, या मागणीसाठी ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा आज, शुक्रवारी, १० ऑक्टोबरला नागपुरात होत आहे. या मोर्चात ओबीसी संघटना व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दुपारी १२ वाजता नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून हा मोर्चा निघेल. संविधान चौकात मोर्चा पोहोचून तेथे जाहीर सभा होईल.

‘ओबीसी’ला धक्का नाही’बुलढाणा : ओबीसी आरक्षणावर आघात होणार नाही. त्यांचा हक्क कायम राहील, असे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. ‘मराठा समाजाने कधीच ओबीसी आरक्षणास विरोध केला नाही. मात्र, शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाचा समावेश ओबीसीत केला नाही. त्यामुळे दरी निर्माण करण्याचे पाप त्यांच्या सरकारकडून झाले, असेही ते म्हणाले.

वंजारी समाजातील युवकाची आत्महत्या; आरक्षणाबाबत चिठ्ठीशेवगाव (जि. अहिल्यानगर) : कोनोशी (ता. शेवगाव) येथे वंजारी समाजातील तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ९) सकाळी समोर आली. अमोल दौंड (२०) असे मृताचे नाव आहे. ‘आमच्या जातीचे काही खरे नाही, मी स्वतःला संपवतो..’ असे लिहिलेली चिठ्ठी आढळली आहे. तालुक्यातील थाटे-वाडगाव येथे नऊ दिवसांपासून वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. समाजाला आरक्षण मिळत नसल्याने उद्विग्न होऊन अमोल दौंड याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले आहे.माहिती मिळताच शेवगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत अमोल याचे आई-वडील ऊसतोडणीचे काम करतात.

माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्याचा स्टेटस ठेवून गळफास

अकोला : आलेगाव येथील माळी महासंघाचे पदाधिकारी, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय बोचरे (५९) यांनी गुरुवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मध्यरात्री  स्टेटस ठेवून मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्र लिहिले. त्यामध्ये ओबीसींना वाऱ्यावर सोडले. त्यांना प्रवाहात येऊ द्यायचे नाही, ओबीसींना सरपंच पदापासूनही दूर राहावे लागेल, अशी भीती व्यक्त केली. स्टेटसवर शासनालाही पत्र लिहिले. ‘मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमुळे ओबीसींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय, शैक्षणिक आणि रोजगाराचे आयुष्य धोक्यात आले. जातीय जनगणना झालीच पाहिजे. विविध ओबीसी नेत्यांचा उल्लेख करत त्यांनी आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र राहून लढा कायम ठेवावा, असेही पत्रात म्हटले.  

English
हिंदी सारांश
Web Title : OBC community uneasy due to state GR; protest march today.

Web Summary : OBC community protests GR, fearing reservation impact. Minister assures protection. Vanzari youth's suicide highlights reservation concerns. Mali leader's suicide note blames GR for OBC insecurity.
टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण