शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घेतली अध्यक्षपदाची शपथ

By admin | Updated: June 4, 2014 01:13 IST

लोकनेते गोपीनाथ मुंडे मुत्सद्दी व ऊर्जावान नेते म्हणून ओळखले जायचे. भाजपच नव्हे तर सर्वच पक्षात त्यांचे चाहते होते. अनेक लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. नागपूर शहराशी त्यांच्या अनेक आठवणी

आठवणींना उजाळा : कारागृहात घालवला होता एक दिवसनागपूर : लोकनेते गोपीनाथ मुंडे मुत्सद्दी व ऊर्जावान नेते म्हणून ओळखले जायचे. भाजपच नव्हे तर सर्वच पक्षात त्यांचे चाहते  होते. अनेक लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. नागपूर शहराशी त्यांच्या अनेक आठवणी जुळलेल्या आहेत. १९८४-८५  मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांचा शपथ व पदग्रहण समारंभ नागपुरातील रेशीमबाग मैदानावर  आयोजित केला होता.  त्यावेळी रेशीमबाग मैदानावर मुंडे यांनी दिलेले भाषण आजही कार्यक र्त्यांंंंच्या स्मरणात आहे. त्यांच्याच  नेतृत्वात भाजपने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. ग्रामपंचायत ते लोकसभा अशा सर्व प्रकारच्या  निवडणुका लढविणार्‍या या नेत्याला राज्याच्या सर्व जिल्ह्यातील पक्ष कार्यक र्त्यांंंंची नावे तोंडपाठ होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. नागपुरात जेव्हा-जेव्हा यायचे, तेव्हा ते संघ मुख्यालयाल  व स्मृती मंदिराला आवर्जून भेट द्यायचे. नागपुरात झाला होता हृद्य सत्कारभारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा पक्षाच्या वतीने नागपुरात हृद्य  सत्कार करण्यात आला होता. कार्यक्रमाला विधान परिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते नितीन गडकरी, उपनेते अण्णा डांगे,  विधानसभेतील उपनेतेद्वय डॉ. दौलतराव अहेर आणि एकनाथ खडसे उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना गोपीनाथ मुंडे यांनी  आपला सत्कार म्हणजे भाजपच्या सामुदायिक नेतृत्वाने दिलेली पावती असल्याचे सांगून पक्षातील एकीच्या बळावर अख्खा  महाराष्ट्र दणाणून टाकण्याची घोषणाही केली होती. कुठल्याही पक्षाच्या प्रथम श्रेणीतील नेत्यांमध्ये अपवादात्मकपणे ऐक्य  आढळते, परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता असल्यामुळे आपल्याला काम करण्यात कुठलीच अडचण येणार  नसल्याचे विधान त्यांनी केले होते.दोन दशकापूर्वी अधिवेशनादरम्यान नागपुरात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचा मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी  मोर्चेकर्‍यांवर लाठीहल्ला केला होता. त्यावेळी मुंडे यांनी कार्यक र्त्यांंंंसोबत एक दिवस कारागृहात घालवला  होता. गेल्या वर्षीही  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंडे यांच्या नेतृत्वात विधानभवानावर शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.  त्यांचे हे नागपुरातील अखेरचे आंदोलन  ठरले. मागील विधानसभा निवडणुकीत मुंडे यांनी भाजप उमेदवारासांठी नागपुरात प्रचार सभा घेतल्या होत्या. मुंडे यांचे भाषण म्हटले  की, टोलेबाजी होणार आणि ते उदंड टाळया घेणार हे ठरलेले असायचे.  प्रचारात मुंडे यांच्या सभांना मागणी असायची. लोकांची  प्रचंड गर्दी व्हायची.  (प्रतिनिधी)..अन् मुंडे फुटपाथवर बसले!२00६ सालचा प्रसंग, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशभरात एकता यात्रा काढली होती. अडवाणींच्या स्वागतासाठी  नागपूर विमानतळावर गोपीनाथ मुंडे आले होते. अडवाणींचे आगमन उशिरा होणार असल्याने त्यांच्या प्रतीक्षेत मुंडे कार्यकर्त्यांंंंसह  फुटपाथवर खुर्ची टाकून बसले होते. त्यावेळी मनमोकळ्या गप्पा केल्या होत्या. रिसोडची टेलिफोन सभा अखेरची ठरलीलोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे स्वत: उभे असल्याने त्यांना राज्यात फारशा सभा घेता आल्या नाही. विदर्भातही मोजक्याच  सभा झाल्या. अमरावती व आमगाव येथे सभा झाल्या. रिसोड येथे त्यांची सभा होणार होती. परंतु त्यांना सभेला येणे शक्य झाले  नाही. सभेला प्रंचड गर्दी जमली होती. लोकांना मुंडे यांच्या भाषणाची उत्सुकता असल्याने मुंडे यांचे टेलिफोनवरून भाषण प्रसारित  करण्यात आले. सुरक्षेचा बागुलबुवा नसायचागोपीनाथ मुंडे यांना कार्यकर्त्यांंंंत मिसळायला आवडायचे. ते स्वत : फेटा बांधायचे. एकाच दिवशी चार-पाच सभा असल्या तरी  त्यांना सभांना नकार नसायचा. सभेसाठी त्यांचे कोणत्याही स्वरूपाचे निर्देश नसायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांंंंना टेंशन नसायचे.  दौर्‍यादरम्यान मुंडे यांचा सुरक्षेचा बागुलबुवा नसायचा.संचेती, मुंडे यांच्याकडून जेवणगोपीनाथ मुंडे नागपूर दौर्‍यांवर आले की, सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचायचे. परळी येथील सहकारी साखर कारखान्याचा  आलेला फॅ क्स बघायचे. कार्यक र्त्यांंंंशी चर्चा करून कार्यक्र म ठरवायचे. त्यांचे जेवण खा. अजय संचेती वा सतीश मुंडे  यांच्याकडून यायचे.