शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

पोषण अभियानाचा खर्च ३०० कोटींवर : राज्य शासनाची कुपोषणमुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 7:00 AM

कुपोषणमुक्ती व बालमृत्यू रोखण्यासाठी १९७५ पासून एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या़.

ठळक मुद्दे ७३ लाख लाभार्थ्यांसाठी राज्यभरात राबतात १ लाख १४ हजार सेविका 

साहेबराव नरसाळे अहमदनगर : पूरक पोषण आहार योजनेचा विस्तार करून केंद्र सरकारने मागील वर्षापासून पोषण अभियान हाती घेतले आहे़. या अभियानावर राज्यात २०१८-१९ या एका वर्षात सुमारे ३०० कोटी रुपये खर्च झाला आहे़. मात्र, या अभियानातून सुरू केलेले रेडीफूड अद्यापही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाही़.कुपोषणमुक्ती व बालमृत्यू रोखण्यासाठी १९७५ पासून एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या़. त्यात लसीकरण, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, असे विविध उद्दिष्ट समाविष्ट होते़. जागतिक बँकेच्या मदतीने सुरू असलेली एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि पोषण सुधारणा प्रकल्पाचा १८ डिसेंबर २०१७ रोजी राष्ट्रीय पोषण मिशनमध्ये समावेश करण्यात आला़.

तथापि, २५ मे २०१८ रोजी राष्ट्रीय पोषण मिशनचे नाव बदलून पोषण अभियान करण्यात आले़ . त्याद्वारे सरकारने बालकांना आणि गरोदर मातांना रेडीफूड देण्याचा निर्णय घेतला़. पहिल्या टप्प्यात ३० व दुसऱ्या टप्प्यात ६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला़. बालके व गरोदर मातांना रेडीफूड पुरविण्यासाठी, तसेच प्रशिक्षण व आनुषंगिक बाबींसाठी केंद्राचा ८० टक्के व राज्याचा २० टक्के निधी खर्च करण्यात येत आहे़.अंगणवाडीत येणाऱ्या प्रत्येक बालकाला पूरक पोषण आहारातून रोज वेगवेगळा आहार पुरविला जातो़. तो पुरविण्यासाठी स्थानिक पातळीवरील बचत गटांना, तर नवीन पोषण अभियानातून रेडीफूडची पाकिटे पुरविण्याचा ठेका राज्यपातळीवरून नियुक्त केलेल्या संस्थेला देण्यात आला आहे़. रेडीफूडचा एकदम २० दिवसांचा साठा अंगणवाड्यांना पुरविण्यात येत आहे़. त्यामुळे काही अंगणवाड्यांपर्यंत रेडीफूड पोहोचला आहे, तर काही अंगणवाड्यांना अद्याप रेडीफूड मिळालाच नाही़. सहा महिने ते ३ वर्षांची बालके आणि गरोदर मातांना हे रेडीफूड पुरविण्यात येते. ३ ते ६ वर्षांच्या बालकांना पूरक पोषण आहार दिला जातो. ..........दूध,   अंडी, चिक्की, केळी, खिचडी...६ महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बाळांना आणि गरोदर मातांना पूर्वी टेक होम रेशन (टीएचआर) योजनेतून शेवया, उपमा, शिरा यासाठीचे कच्चे अन्न पुरविले जायचे.ते शिजवून खावे लागत असे़. मात्र, आता त्याऐवजी थेट रेडीफूडची पाकिटे पुरविली जात आहेत़. अंगणवाडीत येणाऱ्या ३ ते ६ वर्षांच्या बालकांना पूरक पोषण आहार योजनेतून तूर डाळीचा समावेश असणारी खिचडी, केळी, दूध, अंडी, चिक्की, राजगिरा लाडू असे पदार्थ आठवड्यातील एक वार ठरवून दिले जातात़. ............1,10,145- राज्यातील अंगणवाड्या.1,14,385- अंगणवाडी सेविका553-राज्यातील प्रकल्पसंख्या6 - महसुली विभाग73लाख लाभार्थी संख्या .......शासकीय रचनाआयुक्त महिला व बालकल्याण अधिकारीप्रकल्प अधिकारीपर्यवेक्षिकाअंगणवाडी सेविका

...........* असा झाला खर्च पोषण अभियान- १४० कोटी १०६ कोटी - अंगणवाडी सोविकांचे मोबाईल ११ कोटी- अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण३०- पोषण अभियान अंतर्गत इतर बाबी                                                                                                

असा झाला निधी वितरीत 

१.३५:  कोटी प्रशिक्षकांचे मानधन व इतर खर्चासाठी९.७४ : कोटी प्रकल्प स्तरावर

६.८०  कोटी  : जिल्हास्तरावरील कार्यालयीन खर्चासाठी 

.............

                                       

* पोषण अभियानासाठी मंजूर निधी (वर्षाला)                                     २४७ कोटी- पोषण अभियान व विविध कार्यक्रमांसाठी                                      ५० कोटी - नियमित पोषण अभियानासाठी                                      १० कोटी- राज्यांना प्रोत्साहान निधी 

रेडीफूड पुरविणाऱ्या ठेकेदाराला शासन थेट रक्कम अदा करीत असून, पूरक पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटांची बिले स्थानिक पंचायत समितीमार्फत अदा केली जातात़...

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoshan Parikramaपोषण परिक्रमा