शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

… तर आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागेल, एकनाथ शिंदे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 14:55 IST

अल्पमतात असलेला व्हिप आणि गटनेता यांना निलंबन करता येत नाही. आम्ही दोन तृतीयांश बहुमताचं पत्र सचिव आणि उपाध्यक्षांना दिलं आहे, एकनाथ शिंदे यांचं मत.

“अल्पमतात असलेला व्हिप आणि गटनेता यांना निलंबन करता येत नाही. आम्ही दोन तृतीयांश बहुमताचं पत्र सचिव आणि उपाध्यक्षांना दिलं आहे. अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचं निलंबन करणं बेकायदेशीर होईल. लोकशाहीत संख्या आणि बहुमताला महत्त्व असतं. अल्पमत असताना गटनेता बदलण्याचं केलेलं कामही बेकायदेशीर आहे. सर्व सदस्यांना बोलावून, बैठक घेऊन गटनेता बदलता येऊ शकतो. परंतु अल्पमत असतानाही गटनेता बदलण्याचं काम केलंय. त्यामुळे अशाप्रकारचं निलंबन करता येणार नाही आणि केल्यास ते बेकायदेशीर असेल,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेनेनं त्यांच्यावर सुरू केलेल्या कारवाईवर उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“आम्ही स्थापन केलेल्या गटाचं पत्र झिरवळ यांना दिला आहे. त्यांनी नियमानुसार त्यावर कार्यवाही करावी अशी आमची इच्छा आहे,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले. साम मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आमच्याकडे बहुमत आहे, अॅफिडेविट केलंय, खोट्या आकडेवारीवर कारवाई होत असेल, तर न्यायालयीन लढाई लढावी लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. आमची एक बैठक होईल. त्यात विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल आणि पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेकडून आमदारांच्या निलंबनाची मागणीशिवसेनेच्या बंडखोर १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. शिवसेनेने बोलाविलेल्या बैठकीला हे सदस्य उपस्थित नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर आज आणखी चार आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

कोण आहेत आमदार...  १) एकनाथ शिंदे, २) अब्दुल सत्तार, ३) संदीपान भुमरे, ४) प्रकाश सुर्वे, ५) तानाजी सावंत, ६) महेश शिंदे, ७) अनिल बाबर, ८) यामिनी जाधव, ९) संजय शिरसाट, १०) भरत गोगावले, ११) बालाजी किणीकर, १२) लता सोनावणे, १३) सदा सरवणकर, १४) प्रकाश आबिटकर, १५) संजय रायमूलकर, १६) रमेश बोरनारे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र