गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी वाहन खरेदीची संख्या घटली
By Admin | Updated: November 4, 2016 02:22 IST2016-11-04T02:22:08+5:302016-11-04T02:22:08+5:30
दिवाळीमध्ये दुचाकीसह चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या इतर वाहनांच्या खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी वाहन खरेदीची संख्या घटली
अरुणकुमार मेहत्रे,
कळंबोली- दिवाळीमध्ये दुचाकीसह चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या इतर वाहनांच्या खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाची दिवाळी यंदा जोरात झाली नाही. दिवाळीमध्ये गेल्या वर्षी ९ कोटी ३६ लाख ६४ हजारांचा महसूल पनवेल आरटीओला प्राप्त झाला होता. मात्र यावेळी त्यामध्ये जवळपास सव्वा पाच कोटींची घट होवून ४ कोटी ८ लाख ३७ हजारांचा महसूल जमा झाला आहे.
यावर्षी दिवाळीच्या सात दिवसांत पनवेल विभागात फक्त १५८० इतक्याच वाहनांची विक्री झाली. यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. यासर्व वाहनांच्या नोंदणीच्या माध्यमातून आरटीओला जवळपास चार कोटी आठ लाख रु पयांचा महसूल प्राप्त झाला. यासह आरटीओ विभागात विविध कर आणि कारवाईव्दारे कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दिवाळीच्या सणामध्ये शासनास सर्वाधिक महसूल प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्राप्त होतो. पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक अधिकारी अनंत पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांच्यासह आरटीओ अधिकाऱ्यांनी अतिरिक्त काम करत शासनास मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु यावर्षी वाहन खरेदीचे प्रमाण कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
महागड्या गाड्यांकडे ग्राहकांची पाठ
स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून साडेबारा टक्के भूखंड प्राप्त झाले आहेत. त्यांची विक्र ी करून पूर्वी अनेकांनी महागड्या गाड्या खरेदी केल्या. मात्र सध्या रिअल इस्टेटला मंदी आहे, त्याचबरोबर खरेदी-विक्र ीचा व्यवहार होत नाही. या कारणाने भूखंडाला जास्त मागणी नसल्याने स्थानिकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे हातात पैसे नाही याच कारणाने यावर्षी महागड्या गाड्यांची खरेदी आणि नोंदणी झाली नाही.
कमी किमती, त्याचबरोबर बजेटमधील दुचाकी व चारचाकी वाहनांचे खरेदीचे प्रमाणात बऱ्यापैकी होते. त्यातून आम्हाला चांगला महसूल मिळाला. परंतु मंदीचे सावट असल्याने जास्त किमतीच्या गाड्या ग्राहकांनी खरेदी केल्या नाहीत ही वस्तुस्थिती आढळून आली आहे. त्याशिवाय बाजारात चलन फिरते नसल्याचेही कारण आहे.
- सुरेंद्र निकम, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
>09 कोटी ३६ लाख ६४ हजारांचा महसूल पनवेल आरटीओला प्राप्त झाला होता. मात्र यावेळी सव्वा पाच कोटींची घट होवून ४ कोटी ८ लाख ३७ हजारांचा महसूल जमा झाला आहे. 1580 इतक्याच वाहनांची पनवेलमध्ये विक्र ी झाली. यात दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे.
>वर्ष २०१५
वाहनांचे प्रकारसंख्यामहसूल
चारचाकी ६९६८७९२०७७४
दुचाकी १२६८५७०५६९१
एकूण १९६४९३६२६४६५
>वर्ष २०१६
वाहनांचे प्रकारसंख्या महसूल
चारचाकी २७३२८५७६४१०
दुचाकी ७४६४२८५३९१
ट्रान्सपोर्ट ५६१७९७५९६४
एकूण १५८०४०८३७७६५