एनएसईएल घोटाळा; शहासह दोघे अटकेत

By Admin | Updated: May 8, 2014 11:04 IST2014-05-08T11:04:15+5:302014-05-08T11:04:56+5:30

नॅशनल स्पॉट एक्सेंजमधील साडेपाच हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी जिग्नेश शहा यांच्यासह मुख्य वित्तीय अधिकारी श्रीकांत जावलगेकर यांना अटक केली आहे.

NSEL scam; Both the suspects arrested | एनएसईएल घोटाळा; शहासह दोघे अटकेत

एनएसईएल घोटाळा; शहासह दोघे अटकेत

मुंबई : नॅशनल स्पॉट एक्सेंजमधील साडेपाच हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी दोन जणांना अटक केली. यामध्ये कंपनीचे प्रवर्तक आणि अध्यक्ष जिग्नेश शहा यांच्यासह मुख्य वित्तीय अधिकारी श्रीकांत जावलगेकर यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०१३ ला आॅनलाईन ट्रेडींग करणार्‍या नॅशनल स्पॉट एक्सेंज (एनएसईएल) या कंपनीला ५ हजार सहाशे कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कंपनीचे प्रवर्तक जिग्नेश शहा यांनी जाहीर केले. मात्र हा तोटा नसून कंपनीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला होता. त्यानुसार गुंतवणूकदारांनी ३० सप्टेंबरला मुंबई पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी कंपनीचे प्रवर्तक जिग्नेश शहा यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र आपल्याला या घोटाळयासंबंधी काहीच माहिती नसल्याचे शहा यांनी पोलिसांना सांगितले. तसेच हा घोटाळा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंजनी सिन्हा यांनी केला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी शहा यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून योग्य उत्तरे न मिळाल्याने घोटाळ्यात शहा यांचाच प्रमुख सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानुसार अर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजवर्धन यांनी दिली. यापूर्वी गुन्हे शाखेने एनएसईएलचे संजीव भसिन, लोटस ग्रुपचे राजेश मेहता, नामधारी ग्रुपचे इंद्रजित नामधारी आणि गगन सुरी यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी जिग्नेश शहा आणि श्रीकांत जावलगेकर यांना ताब्यात घेतले. एनएसईएलसह फायनान्स टेकनोलॉजी आणि आयबीएमए या कंपन्यांच्या ग्रुपमध्ये हा घोटाळा सुरू असल्याचे पोलिसांना समजले. बोगस खाती, पत्ते च् बोगस गुंतवणूकदारांची खाती तयार करून, बोगस पत्ते वापरुन ही देवाण-घेवाण केली जात होती. ज्या पध्दतीने वित्तीय व्यवहार चालले पाहिजे ती पध्दत न वापरता हा घोटाळा करण्यात आला होता. च्यामध्ये काळा पैसा आणि संशयास्पद पैशांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत या घोटाळयातून ५ हजार १०० कोटींची मालमत्ता हस्तगत केली आहे. अधिकार्‍यांचा ताफा न्यायालयात हजर होता़

Web Title: NSEL scam; Both the suspects arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.