शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक प्रशिक्षणासाठी आता राज्याचे चॅनेल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 06:23 IST

राज्यातील बदलत्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारच्या काळात ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केली.

- सीमा महांगडेमुंबई : राज्यातील बदलत्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारच्या काळात ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केली. मात्र नवीन सरकार आल्यानंतर त्याच धर्तीवर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या विविध कार्यक्रमांकरिता महाराष्ट्राचे नवीन टीव्ही चॅनेल लवकरच सुरू होणार आहे.बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत व्हर्च्युअल शिक्षक प्रशिक्षणासाठी मागील सरकारच्या काळात ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीची निवड झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. वाहिनी महाराष्ट्रात दिसत नसल्याने शाळांनी डीटीएच बॉक्स बसवावा, ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ‘जिओ टीव्ही’ अ‍ॅपमधून वाहिनी बघावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. यामुळे जोरदार टीका झाली. महाराष्ट्रात दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी असताना व ती राज्यभर पोहोचत असूनही गुजराती वाहिनीची मदत घेण्याचे कारण काय, असा सवाल शिक्षण तज्ज्ञांनी उपस्थित केला होता.या पार्श्वभूमीवर ‘वंदे गुजरात’च्या ऐवजी महाराष्ट्राचे स्वत:चे चॅनेल असावे, ज्यावरून शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देता येईल, असा ठराव शिक्षण विभागाच्या बैठकीत झालो. राज्याच्या विद्या परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये उपसचिवांनी (प्रशिक्षण) सदर प्रस्ताव मांडला असून त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.या नवीन चॅनेलच्या प्रकल्पात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सामाजिक न्याय, आदिवासी विकास या विभागांचाही यात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून सर्वच विभागांच्या शिक्षकांना या चॅनेलकडून मिळणाºया प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.दरम्यान, बैठकीचा इतिवृत्तांत, चॅनेलसाठी केंद्राकडून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे समजते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला चॅनेलसाठी आवर्ती ५० लाखांपर्यंतची तरतूद करावी लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन चॅनेल सुरू करण्यासाठी विद्या परिषद, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालयातील काही अधिकारी यांनी गांधीनगर, गुजरात येथे अभ्यास दौºयासाठी जावे, असे शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडून सूचित करण्यात आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र