शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 03:59 IST

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता

औरंगाबाद/बीड : आता जनतेला बदल हवा आहे. बदल गरजेचा आहे. केंद्र व राज्यातील सरकार आता बदलण्याची गरज आहे, असा हल्लाबोल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी औरंगाबाद येथे केले. तर देशातील शेतकरी, महिला, अल्पसंख्याक, दलित त्रस्त आहेत. भाजपाने केवळ आश्वासने देत जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्टÑाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.प्रदेश काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसºया टप्प्याची सांगता औरंगाबादला जाहीर सभेने झाली. भाजपा सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. आज भारत हा जगातील सर्वात जास्त महागाई असलेला देश बनला आहे. सीमेवर तीस वर्षांत मारले गेले नाहीत, एवढे जवान या चार वर्षांत मारले गेले. यांनी काळा पैसा तर आणलाच नाही; पण देशातील पांढरा पैसा काही उद्योगपतींनी पळवला. आमच्या सरकारने जे दिले होते, ते नोटाबंदी व जीएसटीमुळे या सरकारने हिसकावून घेतले. बेरोजगारी वाढवली. सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. कितीही आरोप केले तरी नरेंद्र मोदी मौन धारण करून असतात, असे आझाद म्हणाले. विदेशातील काळा पैसा आणणार होता? तो कुठे आहे? प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार होते? तेही कुठे आहेत? आता हे सांगताहेत की, ते आमचे ‘चुनावी जुमले’ होते. पुढच्या वेळी हेच सरकार सत्तेवर आले, तर तुम्हाला पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत; पण संविधान बदलले गेले तर लोकशाही राहणार नाही. हे लक्षात घ्या, असा इशारा खर्गे यांनी दिला.दुष्काळाचा जीआर म्हणजे फसवणूकदुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळाच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ फसवी घोषणा करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षखा. अशोक चव्हाण यांनी बीड येथे केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस