एम्प्लॉई अॅप च्या माध्यमातून आता महावितरणचा कारभार
By Admin | Updated: August 1, 2016 20:48 IST2016-08-01T20:48:28+5:302016-08-01T20:48:28+5:30
महावितरणचा कारभार ‘पेपरलेस’ होत असतानाच अत्यधुनिक पद्धतीचा एम्प्लॉई मित्र’ हा मोबाईल अॅप सेवेत येत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचा काम सहजसुलभ होणार

एम्प्लॉई अॅप च्या माध्यमातून आता महावितरणचा कारभार
>- राजेश खराडे
बीड, दि. १ - महावितरणचा कारभार ‘पेपरलेस’ होत असतानाच अत्यधुनिक पद्धतीचा एम्प्लॉई मित्र’ हा मोबाईल अॅप सेवेत येत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचा काम सहजसुलभ होणार असून, कारभारात गती येणार आहे. त्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन दिले जात आहे.
वर्षाच्या सुरुवातीला महावितरणने ‘पेपरलेस’ कारभार करून आॅन लाईनवर भर दिला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर अॅपच्या माध्यमातून प्रगतीकडे उचलले जाणारे हे दुसरे पाऊल होय. अॅपमध्ये एम्प्लॉई मित्र, न्यू कनेक्शन, लोकेशन कॅप्चर आणि मीटर रीडिंग अशा ४ प्रकारच्या सोयी-सुविधा आहेत.
एम्प्लॉई मित्रमध्ये विद्युत कर्मचाऱ्यांना वीज वाहिनीत झालेला बिघाड निदर्शनास येणार असून, यावर लागलीच उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. याकरिता केवळ त्या फीडरवरील ग्राहकांचा मोबाईल क्रमांक नोंदलेला असणे गरजेचे आहे.
न्यू कनेक्शनमध्ये कोटेशनपासून ते थेट विद्युत जोडणीपर्यंतची प्रक्रिया ग्राहकांना घरबसला करता येणार आहे. यासाठी केवळ पैसे भरल्याच्या पावती क्रमांकाची नोंद करण्याची ग्राहकांना आवश्यकता आहे.
लोकेशन कॅप्चरद्वारे विद्युत पुरवठ्यात झालेल्या बिघाडाच्या स्थळाचा अंदाज घेता येणार आहे. त्यामुळे कर्मचाºयास थेट घटनास्थळी जाऊन उपाययोजना करता येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. मीटर रीडिंगचा फायदा प्रामुख्याने रीडिंग घेणा-या एजन्सीला होणार आहे. यामुळे बिलासंदर्भातील तक्रारींचे प्रमाण कमी होणार असून, ग्राहकांकडील थकबाकीचे चित्रही स्पष्ट होणार आहे.
कर्मचारी-अधिकायांना मार्गदर्शन
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी लघु प्रशिक्षण केंद्रात अधिकारी, कर्मचारी, एजन्सीजना माहिती-तंत्रज्ञान विभागाचे ठाकूर यांनी मंगळवारी बीड विभागातील कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. या पद्धतीचा घरगुती, औद्योगिक, व्यापारी त्याचप्रमाणे शेती ग्राहकांनाही फायदा होणार आहे. या प्रणालीची अंमलबजावणी गरजेची आहे.
या सेवेचा ग्राहकांना, तसेच महावितरणला मोठा लाभ होणार आहे. त्याकरिता ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.
- अत्याधुनिक पद्धत किचकट असली तरी मार्गदर्शनामुळे याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली जात आहे.
- ग्राहकांबरोबरच याचा कर्मचाऱ्यांनाही लाभ होणार असून, कामात गती मिळणार आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद गरजेचे असल्याचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांनी सांगितले