आता वैद्यकीय चाचण्याही निम्म्या किमतीत

By Admin | Updated: June 3, 2017 03:28 IST2017-06-03T03:28:37+5:302017-06-03T03:28:37+5:30

आरोग्यदायी महाराष्ट्र’कडे वाटचाल करण्याच्या उद्देशाने वन रुपी क्लिनिक संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली असून, आता या क्लिनिकमध्ये

Now at half the cost of medical tests | आता वैद्यकीय चाचण्याही निम्म्या किमतीत

आता वैद्यकीय चाचण्याही निम्म्या किमतीत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘आरोग्यदायी महाराष्ट्र’कडे वाटचाल करण्याच्या उद्देशाने वन रुपी क्लिनिक संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली असून, आता या क्लिनिकमध्ये वैद्यकीय चाचण्या निम्म्या किमतीत करण्यात येतील.
मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ‘ना नफा, ना तोटा’ या धर्तीवर नुकतेच वन रुपी क्लिनिक सुरू झाले. या क्लिनिकमध्ये वैद्यकीय चाचण्या निम्म्या किमतीत करण्यात येत असल्याचे ‘वन रुपी क्लिनिक’चे संचालक डॉ. राहुल घुले यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. गुरुवारपासूनच ही सेवा सुरू करण्यात आली असून थायरॉइड, त्वचाविकार, कर्करोग, जनुकीय दोषाच्या निदानाच्या चाचण्यांचा यात समावेश आहे. त्यासाठी घाटकोपर, मुलुंड, कुर्ला या केंद्रांमध्ये खास आरोग्य तपासणी कक्ष तयार केला आहे.
वन रुपी क्लिनिकची सेवा घरपोचही मिळणार आहे. त्यासाठी ०८०३०६३६१६१ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Now at half the cost of medical tests