शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

आता सोलापुरात होणार फॉरेन्सिक लॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:16 PM

पुणेवारी थांबणार; मुख्यालयाच्या जुन्या इमारतीत दिली जागा

ठळक मुद्दे फॉरेन्सिक लॅबसाठी मुख्यालयातील जुनी इमारत देण्यात आलीलॅबसाठी आवश्यक असलेले कर्मचारी व अधिकारी गृहविभागाकडून नियुक्त शहर व जिल्ह्यासह शेजारी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यालाही फायदा होऊ शकतो

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या ठिकाणी मिळणाºया वस्तू आणि नमुन्यांचे विश्लेषण व्हावे, यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅब) मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनाच्या निधीतून सुसज्ज अशी लॅब उभारण्यात येणार असून, यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे. लॅबसाठी पोलीस मुख्यालयाच्या जुन्या इमारतीत जागा देण्यात आली आहे. 

शहर व जिल्ह्यातील घडणाºया गुन्ह्यांच्या ठिकाणी सापडणाºया विविध वस्तू, नमुने आणि अन्य साहित्यांचा पुराव्यासाठी उपयोग केला जातो. जप्त केलेल्या या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून त्याचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले जाते, त्याचा अहवाल तयार करून तपास यंत्रणांना देण्यात येतो. तपासात या प्रयोगशाळेची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई येथे लॅबचे मुख्यालय असून महाराष्ट्रात नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर या आठ ठिकाणी प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाळा आहेत. राज्यात नव्या पाच प्रयोगशाळा निर्माण करून त्यांना अद्ययावत यंत्रणा देण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडून तयार करण्यात आला होता. 

सोलापूरमध्ये अशी प्रयोगशाळा तयार होणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीत ही फॉरेन्सिक लॅब उभारण्यात येणार आहे. शहर व जिल्ह्यात झालेल्या गुन्ह्यांतील वस्तू विश्लेषणासाठी पुणे येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येत होते. पोलिसांना लॅबच्या अहवालाची वाट पाहावी लागत होती. ही लॅब आता सोलापुरातच होत असल्याने शहर व जिल्ह्यातील पोलिसांना सोयीचे ठरणार आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यालाही होऊ शकतो फायदा : बापू बांगर- फॉरेन्सिक लॅबसाठी मुख्यालयातील जुनी इमारत देण्यात आली आहे. लॅबसाठी आवश्यक असलेले कर्मचारी व अधिकारी गृहविभागाकडून नियुक्त केले जातात. पीडब्ल्यूडी विभागाकडून इमारतीचे नूतनीकरण होईल आणि फॉरेन्सिक लॅब उभारली जाईल. शहर व जिल्ह्यासह शेजारी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यालाही फायदा होऊ शकतो, अशी माहिती प्रभारी आयुक्त बापू बांगर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी