शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

"आता नको पुढच्या आठवड्यात करा चौकशी,’’ प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती

By बाळकृष्ण परब | Published: November 25, 2020 12:40 PM

Pratap Sarnaik News : ईडीने आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ईडीला विनंती केली आहे.

ठळक मुद्देशिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कालपासून ईडीने सुरू केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राचे राजकारणा ढवळून निघाले आहेचौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ईडीला केली विनंतीआता नको तर पुढच्या आठवड्यात आपली एकत्रित चौकशी करावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे

ठाणे - शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कालपासून ईडीने सुरू केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राचे राजकारणा ढवळून निघाले आहे. दरम्यान, ईडीच्या धाडींमुळे माझे तोंड बंद होणार नाही, असे आव्हान देत प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. मात्र ईडीने आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ईडीला विनंती केली आहे. आता नको तर पुढच्या आठवड्यात आपली एकत्रित चौकशी करावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे.सध्या मी कोविड-१९ नियमानुसार क्वारेंटाईन आहे. त्यामुळे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केल्याचे वृत्त आहे. ईडीने प्रताप सरनाईक यांना समन्स बजावून आज सकाळी ११ वातजा चौकशीसाठी बोलावले होते. 

प्रताप सरनाईक बाहेरुन आल्यामुळे क्वॉरंटाईन होणार असल्यामुळे आज ईडी कार्यालयात हजर राहता येणार नाही, पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलवावे अशा विनंतीचे पत्र ईडीला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रताप सरनाईक यांचे मेहुणे याबाबतचे पत्र घेऊन ईडी कार्यालयात येणार आहेत, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, ईडीच्या चौकशीनंतरही प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता.  ईडीनं धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही. फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं, होतं. ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला, अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली, त्याच दिवशी उद्या काय होणार याचा विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. 'या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. ईडीचे छापे पडले म्हणून प्रताप सरनाईकचं तोंड बंद होणार नाही. महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे,' अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली होती. 'ईडीच्या लोकांनी माझं कार्यालय, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रं ताब्यात घेतली. मी गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची सर्व कागदपत्रं आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलं यांनी माहिती दिली आहे. मात्र त्यानंही त्यांचं समाधान झालेलं नाही. मला चौकशीला बोलावल्यास त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास मी समर्थ आहे', असं प्रताप सरनाईक म्हणाले होते. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv Senaशिवसेनाthaneठाणे