शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोठा निर्णय...! महारेराचा बिल्डरांवर आणखी कंट्रोल येणार; फायदा थेट ग्राहकांना होणार

By सचिन लुंगसे | Updated: August 10, 2023 10:59 IST

सुरुवातीला ही यंत्रणा राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त प्रकल्प ज्या क्षेत्रात आहेत त्या मुंबई महानगर( MMR),  पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी महत्त्वाच्या भागातील हा तपशील उपलब्ध करून देणार आहे.

मुंबई : महारेराकडे नोंदणीकृत असलेल्या गृहनिर्माण आणि वाणिज्यिक प्रकल्पांचे सूक्ष्म सनियंत्रण करण्यासाठी अनुपालन कक्षाची ( Compliance Cell) स्थापना महारेराने केलेली आहे. या कक्षाला अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी आता महारेराने पूर्वीच्या अन्वेषकांशिवाय( Investigator) जास्तीत जास्त प्रकल्पांची सद्यस्थिती आणि सत्यस्थिती पूरक छायाचित्रे आणि आवश्यक अहवालासह वेळोवेळी उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या तज्ज्ञ यंत्रणेची मदत घेण्याचे ठरविले आहे. सुरुवातीला ही यंत्रणा राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त प्रकल्प ज्या क्षेत्रात आहेत त्या मुंबई महानगर( MMR),  पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी महत्त्वाच्या भागातील हा तपशील उपलब्ध करून देणार आहे.

भविष्यात अडचणीत येऊ शकणारे प्रकल्प शोधून ( Red flag)त्याचे नियमित संनियंत्रण करणे,  रद्द ( Lapsed)आणि तणावग्रस्त असलेल्या (Stressed)प्रकल्पांचे पुनर्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणे, विकासकांनी संकेतस्थळावर जी माहिती  तिमाही आणि वार्षिकरित्या अद्ययावत करायची आहे त्या माहितीचा सतत पाठपुरावा करून विनियमन तरतुदींचे नियमित पालन होईल हे पाहणे अशी अनेक महत्त्वाची कामे अनुपालन कक्षाला करावी लागतात.

यासाठी त्यांना संबंधित प्रकल्पांची सध्यस्थिती आणि सत्यस्थिती उपलब्ध होणे, ही प्राथमिक गरज आहे. ही माहिती उपलब्ध व्हायला सुरुवात झाल्यानंतर रद्द आणि तणावातील प्रकल्पांच्या पुनर्जीवनाच्यादृष्टीने विविध वर्गवाऱ्या करता येतील. यात भोगवटा प्रमाणपत्र मिळून घरखरेदीदारांना ताबा दिलेले प्रकल्प,   घर खरेदीदारांनी भोगवटा प्रमाणपत्राशिवायच घरांचा ताबा घेतलेले प्रकल्प, प्रकल्पांचे काम सुरू आहे परंतु  अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे , काम बंद पडलेले प्रकल्प, विकासक  काम अर्धवट सोडून निघून गेला असे प्रकल्प, अशा वर्गवाऱ्या करून पुढील नियोजन करता येईल. 

 यासाठी त्यांना संबंधित विकासकांकडून प्रकल्पाचा समग्र तपशील असलेले तिमाही व वार्षिक अहवाल नियमितपणे उपलब्ध होणे, अद्ययावत होणे गरजेचे  असते. येणाऱ्या माहितीबद्दल काही साशंकता असल्यास ते पडताळून घेण्याची सोय आज महारेराकडे नाही. शिवाय ज्यांच्याकडून माहिती येत नाही त्यांचीही झाडाझडती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ठोस माहिती महारेराकडे उपलब्ध होणे गरजेचे आहे. ही यंत्रणा ही माहिती वेळोवेळी  उपलब्ध करून देणार असल्याने या सर्व प्रकल्पांचे अंतिमतः ग्राहकांना फायदा होईल अशा पद्धतीने सूक्ष्म संनियंत्रण करण्याचा  महारेराचा   हेतु साध्य व्हायला मदत होणार आहे.

- गृहनिर्माण व वाणिज्यिक प्रकल्पांचे सूक्ष्म सनियंत्रण अधिक प्रभावीपणे व्हावे यासाठी अनुपालन कक्ष अधिक सक्षम करण्यासाठी महारेरा घेणार बाह्य तज्ज्ञ संस्थेची मदत- या प्रकल्पांची  सद्यस्थिती  आणि सत्यस्थिती समजायला आणि उपाययोजना करायला या माहितीची होणार मदत- प्रारंभी मुंबई महानगर(MMR) पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांच्या प्रकल्पांची सद्यस्थितीतील माहिती छायाचित्रांसह होणार उपलब्ध

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनMumbaiमुंबईNashikनाशिकAurangabadऔरंगाबाद