शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
2
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
3
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
4
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
5
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
6
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...
7
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
8
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
9
Love Life: 'या' राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा!
10
IND vs PAK : पाकिस्तानच्या खेळाडूंना आता घरी बसवा; भारताकडून पराभव होताच अक्रम संतापला
11
२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM
12
"दोन महिन्यांत संपत्तीबाबत माहिती द्या"; नवीन मंत्र्यांना पंतप्रधान मोदींचे निर्देश
13
चंद्राबाबू मुख्यमंत्री होण्यापूर्वी लक्ष्मीची झाली कृपा; कुटुंबाच्या संपत्ती १२ दिवसांत १,२२५ कोटींची तेजी
14
'पाकिस्तानशी युद्ध करावे लागेल...', रियासी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेचें मोठे वक्तव्य
15
मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 
16
...तर आमच्याविरूद्ध फलंदाजी करणं कठीण; पराभव होताच पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणाले...
17
PM मोदींचे मंत्री शपथ घेत असताना मागे दिसलेला प्राणी कोणता?; मांजर, कुत्रा की बिबट्या?; व्हिडीओ पाहून चर्चेला उधाण
18
प्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?
19
दहशतवादी तुफान गोळीबार करत असताना ड्रायव्हरनं दाखवलं प्रसंगावधान, अन्यथा आणखी प्रवाशांचे गेले असते प्राण
20
मोठ्या चढ-उतारानंतर Sensex-Nifty घसरणीसह बंद; IT शेअर्स घसरले, अल्ट्राटेकमध्ये तेजी

"भाजपाला आता आमची गरज वाटत नाही"; मित्रपक्षाचा एकला चलो नारा, महायुतीला धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 4:43 PM

राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. त्याचा फायदा आपल्या पक्षाने घेतला तर उद्या महाराष्ट्रात येणारे चित्र बदलेल असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

मुंबई – शिवसेना-भाजपा-रासप-आरपीआय अशा विविध पक्षांनी एकत्र येत राज्यात महायुतीची घोषणा केली होती. त्यातील आता आगामी निवडणुकीत महायुतीला पहिला धक्का बसला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने एकला चलो रे ची भूमिका घेत निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ना इंडिया, ना एनडीए आपण स्वबळावर लढू असं माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

महादेव जानकर म्हणाले की, राज्यात आणि देशात आपला पक्ष वाढला पाहिजे, यासाठी गेल्या दीड महिन्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाकडून जनस्वराज्य यात्रा काढली आहे. विठुरायाच्या दर्शनापासून आम्ही लोकांना जागे करण्यासाठी ही यात्रा काढत आहोत. अलीकडेच एनडीएची बैठक झाली त्यात आम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते. सुरुवात त्यांची आहे. आम्हाला एनडीए असो वा इंडिया कुणी बैठकीला निमंत्रण केले नाही. त्यामुळे आपण स्वत: पुढे चालले पाहिजे.  भीक मागून हक्क मिळत नाही. सत्ता घ्यायची असेल तर स्वत:च्या हिमतीवर घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत मोठा मासा छोट्या मासाला खातो, तसे मोठा पक्ष छोट्या पक्षांना खातो, त्यामुळे छोट्या पक्षानेही मला मोठे व्हायचे आहे हे ठरवले पाहिजे. आता रासपाने मोठं व्हायचं ठरवले आहे. या देशात भाजपा, काँग्रेस मोठे पक्ष आहेत. त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करणे आवश्यक नाही. राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. त्याचा फायदा आपल्या पक्षाने घेतला तर उद्या महाराष्ट्रात येणारे चित्र बदलेल. ही आमच्यासाठी संधी म्हणून पाहतोय. पक्ष वाढल्याशिवाय ही मंडळी आम्हाला विचारणार नाही. भाजपाला माझी, राजू शेट्टी, विनायक मेटे, रामदास आठवले यांची गरज होती. आता ती गरज वाटत नाही. त्यामुळे आपली ताकद वाढवली पाहिजे अशी भूमिका माजी मंत्री महादेव जानकर यांनी मांडली आहे.

टॅग्स :BJPभाजपाMahadev Jankarमहादेव जानकर