शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आता बोर्इंग नव्हे एअर इंडियाचा एमआरओ!

By admin | Updated: June 7, 2015 01:38 IST

बोर्इंग आणि एअर इंडियाच्या करारानुसार या प्रकल्पाचे संचालन बोर्इंग करणार होते. पण हा प्रकल्प अर्थक्षम नसल्याचे कारण पुढे करीत बोर्इंगने

नागपूर : बोर्इंग आणि एअर इंडियाच्या करारानुसार या प्रकल्पाचे संचालन बोर्इंग करणार होते. पण हा प्रकल्प अर्थक्षम नसल्याचे कारण पुढे करीत बोर्इंगने संचालन करण्यास नकार दिला. त्यामुळे आता या प्रकल्पाचे संचालन एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड करणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली. मिहानमधील बोर्इंगच्या देखभाल व दुरुस्ती केंद्राची (एमआरओ) पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात पीएमओ कार्यालयाशी संपर्क साधल्याचे गडकरी म्हणाले. मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.आर. जगन्नाथ आदी उपस्थित होते. करारानुसार बोर्इंगने ६५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एमआरओची उभारणी केली. एल अ‍ॅण्ड टी कंपनीने आंतरराष्ट्रीय दर्जानुसार बांधकाम केले आहे. एमआरओचे मुख्यद्वार २२ कोटींचे असून जर्मनी येथील अभियंत्यांनी एक महिन्यात उभारले आहे. एमआरओला १० मे २०१५ रोजी डीजीसीएची परवानगी मिळाली असून प्रारंभी बोर्इंनच्या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. दक्षिण-पूर्व आशियातील बोर्इंगच्या विमानांसाठी हा एमआरओ सक्षम असल्याचे गडकरी यांनी सांगितले.बोर्इंगची माघार का?करारानुसार बोर्इंग एमआरओचे मेंटेनन्स बोर्इंग कंपनी करणार होती. पण आता बोर्इंगने माघार का घेतली, असा प्रश्न लोकमत मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.आर. जगन्नाथ यांना प्रकल्पाच्या सादरीकरणादरम्यान विचारला. या प्रश्नावर जगन्नाथ ठोस उत्तर देऊ शकले नाही. पण पत्रपरिषदेत नितीन गडकरी यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. हा प्रकल्प अर्थक्षम नसल्याचे कारण पुढे करीत बोर्इंगने संचालनासाठी नकार दिला. भारतीय अभियंत्यांना ७० ते ८० हजार रुपये देण्यात येतो, पण बोर्इंगच्या अभियंत्यांना अमेरिकन चलनात पगार देणे शक्य नाही.