शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अपात्रता कारवाईसंदर्भात ठाकरे-शिंदे गटांना नोटिसा; पक्षाची घटना मागविणार, कार्यवाही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 06:17 IST

शिवसेना पक्ष कुणाचा हे ठरविण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाची घटना, तसेच बैठकांमध्ये झालेल्या ठरावांची प्रत मागविण्यात येणार आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आमदारांच्या अपात्रतेबाबत पुढील कार्यवाहीला विधिमंडळाने सुरुवात केली आहे. विधानसभा अध्यक्षांकडे ठाकरे व शिंदे गटाच्या यासंदर्भातील पाच याचिका असून त्याबाबत दोन्ही गटांना नोटिसा बजावून त्यांचे स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष कुणाचा हे ठरविण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाची घटना, तसेच बैठकांमध्ये झालेल्या ठरावांची प्रत मागविण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निर्णय घेण्याआधी काेणत्या गटाचा शिवसेना पक्ष हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. हे ठरविण्यासाठी आता दोन्ही पक्षांच्या प्रमुखांकडून  पक्षाच्या घटनेची प्रत मागविण्यासाठी नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पक्षातील नेमणुकांबाबत झालेल्या बैठका आणि त्यात झालेले ठराव यांच्यासंदर्भातील कागदपत्रे मागविण्यात येणार आहेत.    

पाच याचिकांवर निर्णय घ्यावा लागणार-  सुरुवातीला ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून बजावण्यात आलेला व्हिप. त्याचे पालन न केल्याने १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या मागणीबाबतची याचिका.  -  शिंदे गटाकडून भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटातील आमदारांना पाठविलेली नोटीस. -  त्यांना अपात्र ठरविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे केलेली मागणी अशा पाच याचिका परस्परांविरोधात दाखल झाल्या आहेत. -  त्यामुळे प्रभू आणि गोगावले यांना या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. व्हिप, गटनेत्यांची, अध्यक्षांची केलेली निवड याबाबत नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांसंदर्भात स्पष्टीकरण विचारण्यात येणार आहे. 

दोन आमदार वगळले- एकमेकांविरोधात करण्यात आलेल्या याचिकांमध्ये ५४ आमदारांचा समावेश आहे. - मात्र, यामधून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि ऋतुजा रमेश लटके यांना वगळण्यात आले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेRahul Narvekarराहुल नार्वेकर