शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

आदिवासीबहुल भागात ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान; पालघर आणि गडचिरोलील प्रमाण जास्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 20:27 IST

राज्यात ‘नोटा’ला सर्वाधिक २९ हजार ४७९ मते (२.४५ टक्के) पालघर लोकसभा क्षेत्रात, तर २४ हजार ५९९ मते (२.१५ टक्के) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात मिळाली आहेत.

- मनोज ताजने 

गडचिरोली : भारतीय निवडणूक आयोगाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून उपलब्ध करून दिलेला ‘नोटा’चा पर्याय यावेळी राज्यातील आदिवासीबहुल मतदार संघांमध्ये सर्वाधिक वापरण्यात आला आहे. अनेक अशिक्षित मतदारांनी ईव्हीएमवरील सर्वात खाली असलेले बटन दाबल्याने नोटाचे मतदान वाढले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मतपत्रिकेवरील कोणीही उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’, अर्थात ‘नन आॅफ द अबोव्ह’ (यापैकी कोणीही नाही) असा पर्याय ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर सर्वात शेवटी दिला जातो. अशिक्षित मतदारांना ईव्हीएमवरील कोणते बटन दाबायचे हे कळले नसल्यामुळे शेवटचे बटन दाबून ते मोकळे होतात, असा अनुभव अनेक ठिकाणी आला आहे. त्यामुळेच की काय आदिवासीबहुल, मागास भागात नोटाच्या मतांचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीतही गडचिरोली-चिमूर क्षेत्रात नोटाला इतर मतदार संघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान होते.राज्यात ‘नोटा’ला सर्वाधिक २९ हजार ४७९ मते (२.४५ टक्के) पालघर लोकसभा क्षेत्रात, तर २४ हजार ५९९ मते (२.१५ टक्के) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात मिळाली आहेत. याशिवाय ठाणे, नंदूरबार या आदिवासीबहुल जिल्ह्यांतही नोटाचे प्रमाण जास्त आहे. केवळ मतदारांच्या अशिक्षितपणामुळे त्यांच्याकडून नोटाचा पर्याय निवडल्या जात असेल तर यापुढील निवडणुकांमध्ये योग्य ती सुधारणा करावी अशीही मागणी सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

मुंबईतही नोटाप्रगत मुंबईमधील सहाही मतदार संघात नोटाचे प्रमाण जास्त आहे. त्यात मुंबई-दक्षिण (१.८९ टक्के), मुंबई-उत्तर (१.२१ टक्के), मुंबई उत्तर-मध्य (१.१८ टक्के), मुंबई उत्तर-पूर्व (१.३७), मुंबई उत्तर पश्चिम (१.९४ टक्के) आणि मुंबई दक्षिण मध्य (१.७५ टक्के) असे नोटाचे प्रमाण आहे.

‘नोटा’धारक टॉप १० मतदार संघमतदार संघ           नोटाची मते             टक्केवारीपालघर                   २९,४७९                 २.४५ %गडचिरोली-चिमूर     २४,५९९                 २.१५ %नंदूरबार                  २१,९२५                १.७१ %ठाणे                       २०,४२६                १.७५ %मुंबई उत्तर-दक्षिण   १८,२२५                 १.९४ %भिवंडी                    १६,३९७                 १.६३ %मावळ                    १५,७७९                 १.१५ %जालना                   १५,६३७                 १.२९ %मुंबई दक्षिण            १५,११५                 १.८९ %कल्याण                  १३,०१२                १.४६ %

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालVotingमतदान