शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नाते पाहून नाही, तर गुण पाहून उमेदवारी दिली: जयंत पाटील; शरद पवार गटाची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 13:40 IST

"आमच्याकडे इनकमिंग जोरदार होते, मात्र आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही. त्यामुळे मोजक्याच लोकांना प्रवेश व मोजक्याच लोकांना उमेदवारी आहे"

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शरद पवार गटाची ४५ जागांची पहिली यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी येथे जाहीर केली. जयंत पाटील यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे यांना उमेदवारी मिळाली आहे. आम्ही नाते पाहून नाही तर गुण पाहून उमेदवारी दिली, असे पाटील म्हणाले. जयंत पाटील म्हणाले, ही पहिली यादी आहे. अन्य जागांवरील नावे लवकरच निश्चित होतील. मुंबईतून पुढील यादी जाहीर करण्यात येईल. आमच्याकडे इनकमिंग जोरदार होते, मात्र आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही. आम्ही कपडे दगडावर धुतो. त्यामुळे मोजक्याच लोकांना प्रवेश व मोजक्याच लोकांना उमेदवारी आहे.

मुख्यमंत्रिपदाचा आमच्याकडे विषयच नाही. निवडणुकीनंतर एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढणयासाठी आम्ही लढत आहोत. आघाडीमध्ये जागावाटपावरून कोणताही वाद नसून आमचा संयुक्त जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

४४ चे गणित विचारताच जाहीर केली ४५वी जागा

बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देताना काय निकष लावले, यावर पाटील म्हणाले ते तरुण आहेत, संयमी आहेत, अभ्यासू आहेत, सुशिक्षित आहेत. लोकांना त्यांची उमेदवारी हवी होती. एकूण ४४ जागा पाटील यांनी जाहीर केल्या होत्या. ४४ चे गणित काय या प्रश्नांवर त्यांनी लगेच ४५ वी जागा जाहीर करतो असे सांगत हडपसर विधानसभेसाठी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नाव जाहीर केले.

    उमेदवाराचे नाव - मतदारसंघ

१) जयंत पाटील    इस्लामपूर    विद्यमान आमदार २) अनिल देशमुख    काटोल    विद्यमान आमदार३) राजेश टोपे    घनसांगवी    विद्यमान आमदार ४) बाळासाहेब पाटील    कराड उत्तर    विद्यमान आमदार५) जितेंद्र आव्हाड    मुंब्रा कळवा    विद्यमान आमदार ६) शशिकांत शिंदे    कोरेगाव    विद्यमान विधानपरिषद आमदार ७) जयप्रकाश दांडेगावकर    वसमत    माजी आमदार८) गुलाबराव देवकर    जळगाव ग्रामीण    माजी आमदार९) हर्षवर्धन पाटील    इंदापूर    भाजपमधून प्रवेश १०) प्राजक्त तनपुरे    राहुरी    विद्यमान आमदार ११) अशोकराव पवार    शिरुर    विद्यमान आमदार१२) मानसिंगराव नाईक    शिराळा    माजी आमदार१३) सुनील भुसारा    विक्रमगड    विद्यमान आमदार१४) रोहित पवार    कर्जत जामखेड    विद्यमान आमदार १५) विनायकराव पाटील    अहमदपूर    भाजपमधून प्रवेश१६) राजेंद्र शिंगणे    सिंदखेड राजा    विद्यमान आमदार        अजित पवार गटातून प्रवेश १७) सुधाकर भालेराव    उदगीर    माजी आमदार-भाजपमधून प्रवेश१८) चंद्रकांत दानवे    भोकरदन    माजी आमदार-भाजपमधून प्रवेश १९) प्रदीप नाईक    किनवट    माजी आमदार२०) विजय भांबळे    जिंतूर    माजी आमदार२१) पृथ्वीराज साठे    केज     माजी आमदार२२) संदीप नाईक    बेलापूर    माजी आमदार-भाजपमधून प्रवेश २३) बापूसाहेब पठारे    वडगाव शेरी    माजी आमदार-भाजपमधून प्रवेश२४) दिलीप खोडपे    जामनेर     नवीन चेहरा-भाजपमधून प्रवेश२५) रोहिणी खडसे    मुक्ताईनगर    नवीन चेहरा२६) सम्राट डोंगरदिवे    मूर्तिजापूर    नवीन चेहरा२७) दिनेश्वर पेठे    नागपूर पूर्व    नवीन चेहरा२८) रविकांत गोपचे    तिरोडा    नवीन चेहरा२९) भाग्यश्री आत्राम    अहेरी (नवीन चेहरा)    अजित पवार गटातून प्रवेश    ३०) रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी    बदनापूर    नवीन चेहरा३१) सुभाष पवार    मुरबाड    शिंदेसेनेतून प्रवेश-नवीन चेहरा ३२) राखी जाधव    घाटकोपर पूर्व    नवीन चेहरा ३३) देवदत्त निकम    आंबेगाव     नवीन चेहरा ३४) युगेंद्र पवार    बारामती    नवीन चेहरा ३५) संदीप वरपे    कोपरगाव    नवीन चेहरा३६) प्रताप ढाकणे    शेवगाव    माजी आमदार पुत्र३७) राणी लंके    पारनेर    खासदार पत्नी-नवीन चेहरा३८) मेहबूब शेख    आष्टी    नवीन चेहरा३९) नारायण पाटील    करमाळा    शिंदेसेनेतून प्रवेश-माजी आमदार४०) महेश कोठे    सोलापूर शहर उत्तर    नवीन चेहरा४१) प्रशांत यादव    चिपळूण    नवीन चेहरा४२) समरजित घाटगे    कागल    भाजपमधून प्रवेश ४३) रोहित आर. पाटील    तासगाव     नवीन चेहरा ४४) चरण वाघमारे     तुमसर    माजी आमदार-भाजपमधून प्रवेश४५) प्रशांत जगताप    हडपसर    नवीन चेहरा

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस