शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमराठी रिक्षा, टॅक्सी चालक, परिचारिकांसाठी विद्यापीठाच्या जर्मन विभागाकडून मराठीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 04:48 IST

अ‍ॅपवरूनही शिकता येणार मराठी; माय मराठी प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण

- सीमा महांगडेमुंबई : अमराठी टॅक्सी-रिक्षाचालकांना मराठी शिकविण्याचे सर्व प्रयत्न अपुरे पडल्यानंतर अमराठी लोकांना मराठी भाषा व संस्कृतीविषयी आस्था निर्माण व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाचा जर्मन भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांनी त्यांच्यासाठी पुस्तके तयार केली आहेत. ही पुस्तके मुद्रणाच्या टप्प्यावर आहेत.सरकारने पुढाकार घेऊन आरटीओ कार्यालयांच्या ठिकाणी पुस्तकांची व्यवस्था करून किंवा रिक्षा - आॅटो चालकांचे वर्ग घेऊन त्यांना किमान व्यवसायापुरती मराठी शिकता यावी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत माय मराठी प्रकल्पाच्या सहलेखक आणि सहसंपादक प्रा. सोनाली देशपांडे गुजर यांनी व्यक्त केले.मी ज्या राज्यात राहत आहे, तेथील स्थानिक भाषा किमान स्वरूपात येणे आवश्यक असल्याची गरज मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या प्राध्यापिका व विभाग प्रमुख विभा सुराना यांना झाली तेव्हा त्यांनी २०१२ साली माय मराठी प्रकल्प हाती घेतला. यात संभाषणकौशल्ये, व्याकरण, शब्दसंपदा यावर भर दिला आहे. प्रत्येक पातळीचे पाठ्यपुस्तक, त्यात सराव, खेळ, करा व शिका, संवाद, उतारे, कविता, म्हणी-वाक्प्रचार, कठीण शब्दांचे हिंदी व इंग्रजीत अर्थ, वाक्यात उपयोग, दृकश्राव्य साहित्याची डीव्हीडी उपलब्ध आहे. चार लघू अभ्यासक्रमांत परिचारिका, रिक्षा, टॅक्सीचालक, बँक, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यासक्रम तयार केला आहे. या प्रकल्पांतर्गत रिक्षा, टॅक्सीचालकांचे वर्ग घेण्यासाठी ४५ ते ५० शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याचे गुजर यांनी सांगितले.अक्षरे गिरवता येणारअभ्यासक्रम इंटरनेटवरही उपलब्ध करून दिला जाईल. दहा पातळीमध्ये विभागल्या गेलेल्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध असून संवाद शिकताना, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विविध पातळ्याही पार करता येतात. अक्षरे गिरविणे, ध्वनिमुद्रण हेही यात उपलब्ध आहे.

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनauto rickshawऑटो रिक्षाTaxiटॅक्सी