शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

"उद्धवजींनी थोबाडीत मारली तरीही कोणी सत्तेतून बाहेर पडणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 20:08 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट; म्हणे, कॅबिनेट मंत्र्यांचे खासगीत वक्तव्य

कोल्हापूर : दोन्ही कॉंग्रेसनी प्रचंड महत्त्वाची खाती घेवून आपला पारंपरिक कारभार सुरू ठेवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्तेतून बाहेर पडणार नाही असे मित्र असलेला कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलला आहे असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद  साधताना त्यांनी महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. आमदार पाटील म्हणाले, १२ बलुतेदार आणि नव्या १८ क्षेत्रातील असंघटित कामगारांना दरमहा पाच हजार रूपये द्या अशी भाजपची मागणी आहे. यासाठी ५० हजार कोटी लागणार आहेत. आम्ही पुण्यात रिक्षाचालक, शालेय बसेसचे चालक यांना दरमहा काही निधी देतो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्यकर्त्यांना खोट्या केसेस टाकून हैराण केले जात आहे. जरा मनाविरूद्ध वागले की आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताहेत. कोविड आचारसंहितेचा सोयीनुसार वापर सुरू आहे.शिवसेनेची मोठी घोषणा; उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढणार, भाजपवरही गंभीर आरोप

भुजबळांची इमारत जप्त झाली त्याचे काय?खालच्या कोर्टात दोषारोप सिध्द झाले नाहीत म्हणून भुजबळ आणि राष्ट्रवादी ढोल बडवत आहे. याचवेळी त्यांची मुंबईतील १०० कोटींची बेनामी इमारत जप्त झाली त्याचे काय असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

कायदा सुव्यवस्थेचा बोजवारामुंबई आणि पुण्यातील बलात्काराच्या घटना पाहता राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. बलात्कार करणाऱ्यांना लवकर अटक होत नाही, झाली तर दोन दिवसात जामीन होतो. त्यामुळे धाडस वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे मॉनिटेरिंग केले पाहिजे असे पाटील यांनी सांगितले.

मुश्रीफ यांची वृत्तीकोल्हापूरच्या शेजारील गावांची मानसिकता पाहून आम्ही प्राधिकरण तयार केले. नंतर आमचे सरकार गेले. परंतू तुमचे सरकार येवून २२ महिने झाले. तुम्ही प्राधिकरणाला किती निधी दिला असा उलट सवाल पाटील यांनी उपस्थित केला. आंबेओहोळसाठी फडणवीस यांच्याशी भांडून निधी लावून घेतला. परंतू मुश्रीफ यांची वृत्तीच खोटं बोल पण रेटून बोल अशी आहे त्याला काय करणार, असा टोला पाटील यांनी लगावला..

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटील