शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वज्रमुठ सभेत अजित पवारांचे भाषण नाही; कारण काय? काँग्रेसचे एक बडे नेतेही येणार नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 18:29 IST

अजित पवार हे भाजपविरोधात भुमिका घेत नाहीएत, असा आरोप काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांनी केला होता.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपासोबत जाणार  असल्याच्या वावड्यांमध्येच नागपुरात आज उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वज्रमुठ सभा होत आहे. या सभेला मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. असे असताना या सभेमध्ये अजित पवार हे बोलणार नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

अजित पवार हे भाजपविरोधात भुमिका घेत नाहीएत, असा आरोप काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांनी केला होता. यातच शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार आणि शिंदे सरकार पडणार असा दावा विरोधी पक्ष करत आहेत. यामुळे भाजपा अजित पवारांच्या साथीने सरकार स्थापन करणार अशा चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत आहेत. यावर अजित पवार यांनी आपण दिल्लीला गेलो नाही, अमित शहांना भेटलो नाही, असे म्हटले आहे. 

नागपुरमधील महाविकास आघाडीच्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे अनिल देशमुख भाषण करणार आहेत. अजित पवार तिथे असूनही भाषण का करणार नाहीत, याबाबत विचारण्यात आले असता अजित पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाचे दोन नेते भाषण करणार हे आधीच ठरलेले आहे. संभाजीनगरातील सभेत मी आणि धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. इकडे ठरल्याप्रमाणे दुसरे नेते भाषण करतील. 

तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे या सभेला येणार नाहीएत. यासाठी त्यांनी स्थानिक निवडणुकीचे कारण दिले आहे. 'नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरू असल्याने आज नागपूर येथील महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी याबाबत पूर्वकल्पना दिली आहे, असे चव्हाण म्हणाले आहेत.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस