शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar: 'माजी नेत्यांची सुरक्षा काढण्याचा पंजाब सरकारचा निर्णय स्वागतार्ह, महाराष्ट्रातही असा विचार व्हावा'-रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 15:23 IST

Rohit Pawar: पंजाबचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई:पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापूर्वीच आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी सर्व माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही माजी मंत्री-आमदारांची सुरक्षा काढावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. 

राज्यातील पावणेतीन कोटी लोकांना सुरक्षेची गरज आहे, पोलीस ठाणे ओस पडले आहेत. त्यामुळे काही लोकांच्या सुरक्षेपेक्षा मला पंजाबच्या जनतेची सुरक्षा महत्त्वाची वाटते, असे म्हणत भगवंत मान यांनी माजी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन आता रोहीत पवार यांनीही अशाच प्रकारची मागणी केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार''माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल, तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याबाबत विचार व्हावा'', असं रोहित पवार म्हणाले.

या नेत्यांची सुरक्षा गेली?पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या या निर्णयानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह त्यांची पत्नी नवज्योत कौर, मनप्रीत सिंग बादल, भारतभूषण आशू, रझिया सुलताना, परगट सिंग, राणा गुरजीत सिंग, सुखबिंदर सिंग सरकारिया, संजय तलवार, नथू राम, दर्शन लाल, धरमबीर अग्निहोत्री, अरुण नारंग, तरलोचन अशा एकूण 122 नेत्यांची सुरक्षा जाणार आहे. या यादीनुसार राजा वडिंग यांच्याजवळ सर्वाधिक सुरक्षा आहे. माजी नेत्यांच्या सुरक्षेतील 369 पोलीस कर्मचारी आणि कमांडोना हटवण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, ती तशीच कायम राहणार आहे.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारBhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाब