वाकडय़ा नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही
By Admin | Updated: August 17, 2014 02:50 IST2014-08-17T02:50:16+5:302014-08-17T02:50:16+5:30
आयएनएस कोलकाता या संपूर्णपणो स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेमुळे भारताचे बौद्धिक सामथ्र्य आणि उत्पादन क्षमतेची झलक जगाला दिसेल.

वाकडय़ा नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही
मुंबई : आयएनएस कोलकाता या संपूर्णपणो स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेमुळे भारताचे बौद्धिक सामथ्र्य आणि उत्पादन क्षमतेची झलक जगाला दिसेल. भविष्यात भारताकडे कोणीही वाकडी नजर करण्याची हिंमत करणार नाही, असे संरक्षण सामथ्र्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
माझगाव डॉक येथे नौदलासाठी बांधलेल्या ‘आयएनएस कोलकाता’ या स्वदेशी बनावटीच्या सर्वात मोठय़ा युद्धनौकेचे राष्ट्रार्पण करण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्याला संरक्षणमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल, नौदलप्रमुख अॅडमिरल आर.के. धवन, राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार अरविंद सावंत, पूनम महाजन आदी उपस्थित होते. ‘आयएनएस कोलकाता’च्या कप्तानपदी तरुण सोबती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळात देश संरक्षणसामग्री आणि शस्त्रस्त्र उत्पादनात स्वयंभू, स्वयंपूर्ण होईल. त्यासाठी जगातील सर्वोत्तम उत्पादकांना आमंत्रण देण्यात येईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान झाल्यानंतर मुंबईतल्या पहिल्याच जाहीर भाषणात मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण केले. संरक्षण व व्यापार क्षेत्रत नौदलाचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी अधोरेखित केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सप्टेंबर, 2क्क्3पासून माझगाव डॉक लिमिटेडकडून बांधणीला सुरुवात करण्यात आलेल्या आयएनएस कोलकाता या युद्धनौकेचे आज मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले.
आयएनएस कोलकाता ही युद्धनौका स्वदेशी बनावटीचे आजवरचे सर्वात मोठे संरक्षण उत्पादन आहे. सद्य:स्थितीत जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून सागरी सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. त्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. सागरी संरक्षणाच्या दृष्टीने ही नौका भारतीय नौदलाचे बळ वाढवेल, असे मोदी म्हणाले.
पनवेल/उरण : निर्यात क्षेत्र हे केवळ केंद्र शासनाशी निगडित असल्याने राज्यांचा सहभाग त्यात फारसा नसतो. त्यामुळे देशात निर्यात कमी आणि आयात अधिक आहे. आगामी काळात या क्षेत्रत राज्यांना जोडण्यासाठी बंदरांच्या विकासाबरोबरच सागरमाला योजना राबविण्यात येणार आहे. बंदरांबरोबरच एसईङोड, रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग, समुद्री मार्ग यांचीही जोडणी आवश्यक आहे. देशातील उत्पन्नाची निर्यात वाढविण्यासाठी सागरमाला प्रकल्प राबवून सर्व बंदरांची श्रंखला तयार करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला.
महाराष्ट्राला मिळणार 4क्क् कोटींची वीज मोफत
सोलापूर : गुजरातमधील सरदार सरोवराची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीचे केंद्रातील सरकार परवानगी देत नव्हते, मात्र मी पंतप्रधान झाल्यानंतर 15 दिवसांत याला मंजुरी दिली़ यामुळे येथे जलविद्युत प्रकल्प होण्यास गती मिळाली असून, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 4क्क् कोटींची वीज मोफत मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल़े -