शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्राच्या इतिहासात असं कुणी पाहिलं नाही, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर…’’ अजित पवारांची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 12:54 IST

Ajit Pawar Criticize CM Eknath Shinde: पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारत फिरत आहेत. रात्री दहानंतरही सभा घेताहेत, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर ती बाब बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले.

मुंबई - शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ४० आमदारांसह भाजपाचा पाठिंबा घेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मुख्यंमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रिया खोळंबली असून, पुरामुळे फटका बसलेल्या नागरिकांना मदत मिळत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तसेच पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारत फिरत आहेत. रात्री दहानंतरही सभा घेताहेत, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर ती बाब बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारचा कारभार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज घणाघाती टीका केली. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं पहिलं प्राधान्य हे जनतेचे, पुरग्रस्तांचे प्रश्न सोडवायला असलं पाहिजे. मुख्यमंत्री झाल्यापासून कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारण्याला दुसरं प्राधान्य असलं पाहिजे.राज्यातील शेतकरी पुरामुळे संकटात असताना त्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारतात हे संवेदनशून्यतेचं उदाहरण आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

सध्या राज्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत.  कुठले कार्यक्रम घ्यायचे हा  मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पण  रात्री १० वाजल्यानंतर मुख्यमंत्री असो वा कुणी व्यक्ती असो माईक बंद करायचा असतो. आम्हीही कधीकाळी उपमुख्यमंत्री होतो. तो नियम सगळ्यांना आहे. तो नियम सुप्रिम कोर्टाने काही दिवसांसाठी शिथिल केला आहे. पण हा नियम  मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कुणीही पाळताना दिसत नाही. राज्याचे मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील. तर तिथले सीपी, तिथले एसपी करणार काय?  एसपींना, सीपींना आदेश देणारेच जर नियम मोडायला लागले, कायदे मोडायला लागले, घटना पायदळी तुडवायला लागले तर ही बाब बरोबर नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कुणी पाहिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला आवर घातला पाहिजे. उत्साही कार्यकर्त्यांना समज दिली पाहिजे. १० वाजलेत आता आपण नियमांचं पालन केलं पाहिजे, असं सांगितलं पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. ठिक आहे उत्साह असतो. मात्र दुसऱ्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात असं काही झालेलं दिसलं नसल्याचंही अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांचे दहाच्या नंतर कार्यक्रम सुरू असलेले, किंवा लाऊस स्पीकर सुरू असलेला मी पाहिलं नाही. त्यामुळे मी त्याबाबत काही बोलणार नाही. पण एकंदरीत मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान झालं आहे. सध्या मुख्यमंत्री इतर व्यापात अडकलेले असल्याने ते इतर ठिकाण फिरताहेत, इतर मान्यवरांच्या भेटीगाठी घेताहेत, दर्शन घेताहेत. त्यांनी कुणाचं दर्शन घ्यावं याबाबत मला काही बोलायचं नाही, असेही अजित पवार म्हणाले.     

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार