शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरेंचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी केली नाही; संजय राऊत गरजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:37 IST

हे महाराष्ट्राचं आणि हिंदुत्वाचं दुर्दैव आहे. चंद्रकांत पाटील हे बोलले असले तरी त्यांच्या मुखातून भाजपा हे बोलली आहे अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई - भाजपाच्या मांडीला मांडी लावून जे सरकारमध्ये बसलेत ते मिस्टर डॉ. बिन आणि त्यांच्या ४० लोकांनी हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली हे तीर मारत असतात. त्यांच्याकडून चंद्रकांत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरेंचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती. तुम्ही गुलाम झाल्यामुळे, शिवसेना फोडल्यामुळे चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे इतर नेते शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करतायेत असा आरोप करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फुटीर आमदारांवर गरजले. 

बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही - चंद्रकांत पाटील

खा. संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री गुलाम आहेत. हिंमत असेल तर यावर प्रतिक्रिया द्यावी. पण गुलामाला हिंमत नसते. बाबरी पाडली त्यानंतर भाजपाने पलायन केले हा इतिहास आहे. बाबरी पाडणारे आमचे, भाजपाचे अन्य कुणी नव्हते ते शिवसैनिक होते असं विधान तेव्हाचे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर लगेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जर बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे असं स्पष्ट विधान केले असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही पळपुटे नव्हतो आणि नाही. ज्या पळपुट्यांना घेऊन आज भाजपाने सरकार बनवले. त्यांची हिंमत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चिखलफेक करू लागलेत. त्या चिखलात बसून डॉ. मिंदे आणि ४० आमदार सत्ता भोगतायेत. हे महाराष्ट्राचं आणि हिंदुत्वाचं दुर्दैव आहे. चंद्रकांत पाटील हे बोलले असले तरी त्यांच्या मुखातून भाजपा हे बोलली आहे. सत्तेचे मिंदे यावर तोंड उघडणार नाहीत हे माहिती आहे. हिंमत असेल तर राजीनामा द्यावा असं आव्हानही संजय राऊत यांनी दिले. 

दरम्यान, आम्ही भाजपाच्या सत्तेत सामील झालेले गुलाम आणि मिंदे आहोत हे जाहीर करा अन्यथा राजीनामा द्या. शिवसेना आणि हिंदुत्वाचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. अयोध्या आणि त्यानंतरच्या घडामोडीत हिंदुत्वाची मशाल धगधगती राहावी यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे मोठे योगदान आहे. लखनौला बाळासाहेब ठाकरे विशेष न्यायालयासमोर हजर झाले होते हे भाजपाला माहिती नाही का? बेईमान, जे स्वत:ला हिंदुत्ववादी मानतात त्यांनी तोंडाचे कुलूप उघडावं मग आम्ही काय करायचे ते पाहू असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे