शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

ज्ञानोबा, तुकोबा आणि विठ्ठलाच्या दर्शनाला कशाला कुणाची परवानगी हवी : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 17:35 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्मा, रामायणाला विरोध करतात. ते नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात..

ठळक मुद्देजोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यास दिली भेट; माऊलींच्या समाधीचेही घेतले दर्शन

आळंदी : विठ्ठलाच्या, माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनाला जायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितलं की, तुम्हाला परवानगी नाही. तर त्यांना वारकरी संप्रदायाचा अद्याप विचारच समजलेला नाही. विशेषत: सच्चा वारकरी अशी भूमिका कधीही घेणार नाही. आणि त्याकडे मी फारसे लक्ष देत नाही असा खोचक टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता राष्ट्रीय वारकरी परिषदेला लगावला.   स्वानंद सुखनिवासी सदगुरू विष्णुबुवा जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यास सदिच्छा भेट देण्यासाठी शनिवारी (दि.८) पवार आळंदीत आले होते. याप्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी कामगार मंत्री दिलीप वळसे - पाटील, आमदार दिलीप मोहिते - पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, ह.भ.प. मारुती महाराज कुर्हेकर, अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, माजी आमदार विलास लांडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, रामयनाचार्य रामरावजी महाराज ढोक, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, बबनराव कुऱ्हाडे, डी. डी. भोसले, मुख्याधिकारी समीर भूमकर, सुरेश वडगावकर, कैलास सांडभोर आदिंसह अन्य मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.              पवार पुढे म्हणाले, समाजाने खूप काही दिलं आहे. आजपर्यंत चौदा वेळा निवडून दिले असून चार वेळा मुख्यमंत्री केले. त्यामुळे ५२ वर्ष अखंड समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ज्या समाजाने आजपर्यंत भरभरून प्रतिसाद दिला; त्या समाजासाठीच स्वत:ला वाहून घेणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे आपण ज्या विकासकामांची मागणी करत आहात अशी कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील. विशेषत: आळंदीतील प्रश्न स्थानिक आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व नगराध्यक्षांची विशेष बैठक घेऊन मार्गी लावू. आणि हे आश्वासन नाही तर आपले कर्तव्य असल्याचे पवार यांनी सांगितले.  दरम्यान माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने  विश्वस्तांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

पंढरपूर येथे राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्धी पत्रकात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये; अशा आशयाचं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने जारी केले होते. शनिवारी (दि.८) आळंदीत शरद पवारांनी यावर भाष्य केले. 

 " आपणाला जो रस्ता पसंत आहे; त्या रस्त्यावर प्रामाणिक पणाने जायचं असत. तिथे बांधिलकी ठेवायची असते. त्यांच्यामध्ये तडजोड करायची नसते. याच भावनेने आळंदीत येऊन माऊलींचे दर्शन घेतले. तसेच जोग महाराज जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी झालो. मी स्वत:ला धन्य मानतो.            - शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरPandharpurपंढरपूरdehuदेहूSharad Pawarशरद पवार